NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

मंगलवार, 20 जून 2017

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांची हदगाव तालुक्यात दारूच्या साठेबाजांवर कार्यवाही

नांदेड, हदगाव, हिमायतनगर, तामसा, वाळकी बा.भागात विनापरवाना देशी दारू विक्री करण्याच्या बेताने वाळकी येथे मळवंदे यांच्या घरासमोर ३० बॉक्स, देशी दारू अंदाजित ०१ लाख ४४ हजार, दोन चारचाकी टेम्पो असा एकूण ९ लक्ष रुपयाचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने बुधवारच्या मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास पकडून धडाकेबाज कार्यवाही केली आहे.

मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात

दवणे पेट्रेल पंपावरील भेसळ प्रकरणाची कार्यवाही थंडबस्त्यात....

प्रयोगशाळेकडे पाठविन्यासाठी घेतलेले नमुने बदलल्याचा संशय
 
हिमायतनगर, दवने पेट्रोलपंपावर रॉकेल मिश्रीत पेट्रोलच्या तक्रारीनंतर दि.०४ मे २०१७ रोजी हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार डि.एन. गायकवाड यांनी चौकशी करून पेट्रोलचे सैंपल प्रयोग शाळेच्या तपासणीसाठी घेतले खरे. दीड महिन्याचा कालावधी लोटला असताना अद्याप कार्यवाही थंड बस्त्यात पडली आहे. त्यामुळे प्रयोगशाळेकडे पाठविन्यासाठी घेतलेले नमुने बदलून कार्यवाही दडपण्याचा प्रकार होत असल्याचा संशय नागरीकातून व्यक्त केला जात आहे.

पत्रकारितेतील जेष्ठ तारा निखळला....

जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे यांचे निधन

भास्कर काका दुसे यांचा जन्म १४ जून १९२५ साली झाला. गेली ४५ वर्ष ते पत्रकार क्षेत्रात वावरत होते. त्यांनी आपल्या कर्तबगारीने एक ध्येयवाद तथा जेष्ठ पत्रकार म्हणून ओळख निर्माण केली आहे.  वयाच्या ९२ व्या वर्षी मंगळवार दि.२० जून २०१७ च्या रात्री ११.१५ त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने पत्रकारिता क्षेत्रातील एका तारा निखळल्याचे दुःख जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्याला झाले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार हा लेख....

जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे यांचे निधन

हिमायतनगर(प्रतिनिधी) हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे पहिले जेष्ट पत्रकार तथा जेष्ठ भाजपा सदस्य श्री भास्कर दुसे काका यांचे मंगळवारी रात्री ११.१५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, भाऊ, व अन्य नातेवाईक असा परिवार आहे, त्यांच्या पार्थिवावर दि. २१  जून २०१७ बुधवारी सकाळी ११ वाजता हिमायतनगर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले आहे.

यांच्या आत्म्याला शांती लाभो इच ईश्वर चरणी नांदेड न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली  - अनिल मादसवार व परिवार http://nandednewslive.com

महिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिचा सत्कार

हिमायतनगर, नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १२ परीक्षेच्या निकालात हिमायतनगर येथील महिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिने ८५ टक्के गुण घेऊन हुजपा कॉलेजमधून दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवायला आहे. तिच्या याशाबद्दल करते क्लासेसच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाचे बिलोलीत चार ठिकाणी छापे

धडाकेबाज कार्यवाहीने बिलोली शहर हादरले
हप्तेखोर पोलिसांचे निघाले धिंडवडे
नांदेड, अनिल मादसवार.... नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्याच्या हप्तेखोर पोलीस अधिकाऱ्यांमुळे खुले आम चालणाऱ्या दोन जुगार अड्यावर, हॉटेल मराठवाडा आणि एक दारू अड्डा अश्या चार ठिकाणी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने छापे टाकले असून, २९ आरोपीसह दुचाक्या, मोबाईल, दारूचा साठा आणि गैस सिलेंडर असा असा जवळपास पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भोकरमध्ये ६७ हजाराची देशी दारू जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कार्यवाही
 
भोकर, मनोजसिंह चौव्हाण... शहरातील किनवट रस्त्यावरील एका शिवारात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकुन अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने ठेवलेली ६७ हजाराची देशी दारू जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. या कार्यवाहीने उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिस प्रशासनाच्या कारभारावर शंका व्यक्त केल्या जात आहे. 

मुख्य रस्त्यावरील देशी आणि विदेशी दारूची दुकाने

उत्तम शासकाचे आदर्श उदाहरण म्हणजे आहिल्यादेवी -आ. हेमंत पाटील

नांदेड, अनिल मादसवार.... आहिल्यादेवी ह्या उत्तम शासकाचे आदर्श उदाहरण असून ते आजही पारदहशक ठरणारे आहे. मंदिर जिर्णोद्धारासोबतच शैक्षणिक सुविधाचे खुले दालन सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर अहिल्यादेवी होळकर यांनी केले आहे असे प्रतिपादन शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केले.

आता नांदेडकरांना मिळणार एक दिवसा आड पाणी पुरवठा

नांदेड, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापरही कमी प्रमाणात होत आहे तसेच विष्णुपूूरी प्रकल्पात पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ झाली असून नांदेडकरांना आता 20 जून रोज मंगळवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस होत असून याचबरोबर विष्णुपूरी जलाशयाच्या वरील भागात

वसुली कमी आणि आता मिळणार वसुली पर्यवेक्षकांना नारळ

नांदेड, महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता धारकांच्या कराची वसुली अद्यापही एकाही झोनने 50 टक्क्यांपर्यंत नेली नाही. 20 मे ही अंतिम तारीख होती पण संबंधीत अहवाल झोन अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे 25 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वसुली उद्दिष्टे पूर्ण करावे, अन्यथा वसुली पर्यवेक्षक यांच्यावर याची सर्वस्व जबाबदारी राहणार असल्याचे उपायुक्त संतोष कंदेवार यांनी सांगितले आहे.

शहरातील सन 2017-18  या वर्षांतील कराचे वसुलीचे

पंचायतराज समितीने जिल्हा परिषदेच्या सीईओला

दिली करणे दाखवा नोटीस 
नांदेड, जिल्ह्यामध्ये मनरेगा अंतर्गत मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे झाले असले तरी तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. राज्य विधीमंडळाचे पंचायतराज समिती नांदेड दौऱ्यावर येऊन त्यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमीततेवर बोट ठेवले होते. यामध्ये तत्कालीन सीईओ अभिमन्यू काळे यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता, यांची चौकशी करण्यात यावी असे आदेश पंचायतराज समितीने दिली असतानाही चौकशी का करण्यात आली नाही. असा सवाल करीत समितीने जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना कारणेदाखवा नोटीस बजाविली आहे.

म्हणे 4 लाखांची चोरी मात्र दुजोरा कोणीच देत नाही

नांदेड, रामप्रसाद खंडेलवाल ... नांदेड शहरातील एका बँके समोरून चार लाख रुपयांची बॅग एक चोरट्याने लंपास केल्याची खबर आज दुपारी 4 वाजे पासून व्हाट्सअप या संकेत स्थळावर वायरल झाली पण रात्री 8 वाजे पर्यंत कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.हा ४ लाखांची बॅग चोरणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आज दुपारी व्हाट्सअप या संकेत स्थळावर नांदेडच्या

शेतकर्‍यांसाठी दिलीप धोंडगें यांनी केले बँकेसमोर आंदोलन

लोहा, प्रतिनिधी .... नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनी तर्फे विमाधारक शेतकर्‍यांना देण्यात आलेली रक्कम कर्ज खात्यात वळविण्याचे काम थांबवा अन्यथा लोहा शाखेच्या बँक ऑफ इंडियासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज लोहा शहरातील बँक ऑफ इंडियासमोर आज मंगळवारी धरणे आंदोलन केले सुधारणा न झाल्यास  आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. 

दारुदुकान वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकानी व्यापाऱ्यांची

दुकाने पाडताना हा विषय का घेतला नाही - विनोंद पापीनवार


कंधार, मयूर कांबळे .... नगर पालीकेची सर्वसाधारण सभा दिनांक १९ जुन रोजी पार पाडली. या सभेमध्ये कंधार   शहरातील काही राजकीय लोकांच्या बार व दारु दुकाने वाचवण्यासाठी शहरातील मुख्य रस्ता हस्तांतरीत करुन घेण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी विषय अजिंड्यावर घेतला होता पंरतु यावेळी अपक्ष नगरसेवक विंनोद पापीनवार यांनी आवाज उठवून व्यापाऱ्यांचे दुकाने पाडाल्या जात होती त्यावेळी रस्ता हस्तांरणीत करा असा ठराव का घेतला नाही आज दारुचे दुकान वाचवण्यासाठी रस्ता हस्तांतर.करण्याची गरज वाटत आहे.

भोकरच्या वनपालाला 2 हजाराची लाच घेतल्या प्रकरणी 4 वर्ष सक्तमजुरी

आणि 3 हजार दंड 

नांदेड(खास प्रतिनिधी) भोकर येथील वन परिमंडळ कार्यालयातील एका वर्ग तीनच्या कर्मचाऱ्याने एका शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यासाठी आवश्यक असलेला पंचनामाच करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतली. त्या प्रकरणात भोकरचे विशेष न्यायाधीश एम.एस.शेख यांनी 4 वर्षे सक्त मजूरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Kandhar Bhokar Wratt कंधार - भोकर बातमीपत्र

सोमवार, 19 जून 2017

नांदेडच्या कारागृहात निधी उपलब्ध नसल्याने जनरेटर बंदच

नांदेड, रामप्रसाद खंडेलवाल नांदेड येथील जिल्हा कारागृहात ७ लाख रुपयांचा जेनरेटर असतांना त्यात डिझेलसाठी निधी उपलब्ध नसल्याने वीज  गेली तर जिल्हा कारागृहात अंधार पसरतो. आजही कांही अशीच परिस्थिती रात्री ८.३० पर्यंत म्हणजे वृत्त लिहिपर्यंत होतीच.

नांदेड येथे वर्ग - २ चे जिल्हा कारागृह आहे. या कारागृहात २०० कच्या कैदाची राहण्याची कायदेशीर सुविधा असतांना येथे

गोदावरी नदी संवर्धनासाठी दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी डोंगरे

नांदेड, अनिल मादसवार,जिल्ह्यातील गोदावरी नदी संवर्धनासाठी दिर्घकालीन उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा पर्यावरण समितीची अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. नांदेड जिल्हा पर्यावरण समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.डी. पी. सावंत, आ. अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील, आ. अमिता चव्हाण, मनपा आयुक्त गणेश देशमुख, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुधीर शिवणीकर, डॉ. अर्जुन भोसले, सुरेश जोंधळे,

शेतकरी कर्जासाठी लोह्यात दिलीप धोंडगे यांचे बँकेसमोर आंदोलन

लोहा, शेतक-यांच्‍या पिक विम्‍याचे रक्‍कम कर्जात कपात करून घेतली जात आहे. नवीन पीक कर्ज वेळेत उपलब्‍ध करून न देता बॅंक कर्मचारी शेतक-यांसोबत दंडेलशाही करीत आहे. 

यासाठी मंगळवारी बॅंक ऑफ इंडिया शाखा लोहा या बॅंकेसमोर जि.प.चे माजी उपाध्‍यक्ष तथा राष्‍ट्रवादीयुवक कॉंग्रेसचे सरचिटणीस दिलीपदादा धोंडगे यांच्‍या नेतृत्‍वाखाली शेतक-याचे आंदोलन करणार आहेत. जिल्‍हा परिषदेचे माजीउपाध्‍यक्ष दिलीपदादा धोंडगे यांनी लोह्यातील बॅंक ऑफ इंडिया शाखेच्‍या व्‍यवस्‍थापकांना लेखी निवेदन दिले. बॅंकेनी पीक विम्‍यातून कर्ज कपाती करून घेवू नये तसेच नवीन कर्ज तातडीने द्यावे या व अन्‍य मागण्‍यासाठी आज मंगळवारी बसस्‍थानका समोरील बॅंके समोर अन्‍यायग्रस्‍त शेतक-यांसह दिलीपदादा आंदोलन करणार आहेत. तेव्‍हा शेतकरी यात मोठ्या संख्‍येनी सहभागी होणार आहेत असे सांगण्‍यात आले.

स.पो.नि. विठ्ठल पाटील यांची गुटखा कार्यवाही..

२ लाखाचा माल जाळला

लोहा, शहरातील गुटख्‍यावर मागील आठ दिवसापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी धाड टाकली. २ लाख ५ हजाराचा माल जप्‍त केला अन्‍न निरिक्षक यांच्‍या पंचनाम्‍या नंतर या गुटख्‍याची पोलीस ठाण्‍यात होळी करण्‍यात आली.

शहरातील एका गुटखाविक्री दुकानावर नव्‍यानेच रूजू

नाट्यकलावंत मास्टर लक्ष्मण काळेवार यांचे निधन

नांदेड, प्रतिनिधी       आपल्या सशक्त अभिनयाने मराठवाड्यात विशेषतः ग्रामीण भागात ओळख निर्माण करणारे जुन्या पिढीतील नाटय कलावंत मास्टर लक्ष्मण महादू काळेवार यांचे वृद्धपकाळाने काल वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले.

मास्टर या टोपण नावाने ओळखल्या जाणारे काळेवार यांनी गेल्या 35 वर्षापासून नाट्य कलावंत म्हणून कारकीर्द गाजवली. त्यांनी अभिनयाची सुरुवात शाहीर

खा.अशोक चव्हाणांच्या प्रयत्नाने नांदेडात पासपोर्ट कार्यालयास मंजुरी

नांदेड, अनिल मादसवार - देश- विदेशात नौकरी, व्यवसाय , पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता नांदेड शहरातच पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. तसेच यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे काल मंजूर झालेल्या यादीत नांदेड शहराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांची पासपोर्टसाठी होणारी परवड थांबणार आहे.

शहरात लवकरच मोफत वायफाय सेवा - खा.अशोकराव चव्हाण

नांदेड, नांदेड जिल्हा दूरसंचार सल्लगार समितीची बैठक समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत वायफाय सेवासह इतर विषयावर चर्चा करण्यात आली. 

नांदेड जिल्हा दूरसंचार समितीची बैठक दूरसंचार कार्यालयाच्या बैठक दालनात समितीची अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत समितीचे सदस्य माणिक पेंटे, बचूराज देशमुख, संभाजी

आभाळात ढगांची गर्दी

गेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर शहरावर आभाळात ढगांची गर्दी होत आहे, परंतु पाऊस पडत नसल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. छाया - बालाजी बलपेलवाड 

विष्णुपूरी प्रकल्पातच किवळा बंधार्‍याचा समावेश - शिवतारे

आ.चिखलीकरांच्या प्रयत्नाला यश

नांदेड, गेल्या वीस वर्षापासून प्रलंबीत असलेल्या किवळा साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विष्णुपूरी प्रकल्पातच किवळा बंधार्‍याचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेवून आर्थीक मंजूरीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्यामुळे कंधार व नांदेड दक्षिण मतदार संघातील कांही गावांचा पिण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार बाभळी धरणाचे दरवाजे बंद करण्यासाठी समन्वय साधा

माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


नांदेड, अनिल मादसवार- तेलंगणाच्या सिमेलगत असलेल्या बाभळी धरणाचे दरवाजे पाण्याच्या उपलब्धतेनुसार निर्धारित वेळेपूर्वी बंद करण्यासाठी तेलंगणा राज्याशी समन्वय साधावा व या धरणाच्या पाण्याचा महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त उपयोग करण्यात यावा अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खा.अशोकराव चव्हाण यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच एक पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये त्यांनी बाभळी बंधार्‍या संबंधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख केला आहे.

धानोराच्या सरपंच पदी सत्वशिला भेंडेकर यांची निवड

नरसी फाटा, नायगाव तालुक्यातील धानोरा ( त.मा.) येथील सरपंच मागील एक महिन्यापूर्वी  आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने बुधवारी येथील नव्याने  संरपच पदाची निवड करण्यात येवून गोविंद पाटील धानोरकर यांच्या गटाच्या सरपंच म्हणून  सत्त्वशीला नागोराव भेडेकंर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आ.वंसतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांखाली धानोरा या गावची ग्राम पंचायत निवडणूक

आभाळ येतोय दाटून...पण पावसाचा पत्ता नाही.....!

दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या; शेतक-यांचे डोळे अभाळाकडे

नरसी फाटा, सुभाष पेरकेवार -मृगनक्षञ निघून आज दहा दिवस होत असून नरसी सह नरसी सर्कल मध्ये  पेरणीयुक्त पाऊस झाला नाही. गेल्या चार दिवसापुर्वी झालेल्या साधारण या पावसानंतर काही शेतकरी पेरणी सुरू केली तर बहुतांश शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. ब-याच ठिकाणी पाऊस बरसतो आहे पण या भागात पेरणी युक्त पाऊस कधी होईल म्हणून शेतकरी अभाळाकडे डोळे लावून बसला आहे. 

कोळी समाजाचे रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती होणार!

नवी दिल्ली, राष्ट्रपतीपदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर एनडीएकडून आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली असून दि.२३ जून रोजी ते राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतील. दलित समाजातून येणाऱ्या कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन या समाजाला भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदी-शहा जोडीने केला आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांना कोविंद यांच्या उमेदवारीविषयी कळविण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

धार्मिक व सामाजिक बंधुभाव इफ्तेहार पार्टीतून जोपासल्या जातो- संजय भोसीकर

कंधार, मयूर कांबळे तालुक्यातील पानभोसी या गावी दि 18 रोजी सायंकाळी रमजान चे औचित्य साधुन माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी इफ्तेहार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी धार्मिक सलोखा जोपासण्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपापल्या पद्धतीने काम करावे त्यामुळे धार्मिक व सामाजिक बंधुभाव इफ्तेहार पार्टीतून जोपासल्या जाऊ शकतो असे प्रतिपादन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी बोलताना केले.

पतंजली योग समिती तर्फे कंधारमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

कंधार, मयुर कांबळे, आयुष मंत्रालय द्वारा आयोजित दिनांक २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन पतंजली योग समिती कंधारच्या वतीने दरवर्षी प्रमाने याही वर्षी योग दिनाचे आयोजन करण्यात आले . कंधार शहरातील योग प्रेमी साधकांनी शहरातील बालाजी मंदीर भवानीनगर कंधार येथे शांती,कल्याण आणि स्वाथ्यासाठी जगात हा दिवस सर्व धर्म ,पंथ,संप्रदाय विविध सामाजिक संघटनांनी, शासकीय,निमशासकिय कर्मचार्यांनी व विद्यार्थ्यांनी या दिवशी सहभाग नोंदवून आपल्या भारतीय संस्कृतीला सन्मानीत करण्याचे आवाहन पतंजली योग समिती तालुका प्रभारी नीळकंठ मोरे यांनी केले आहे.

भोकर आगाराची प्रगती कायम ठेवा - आर. वाय. मुपडे

प्रदिपकुमार पोवार नवीन आगारप्रमुख 

भोकर, मनोजसिंह चौव्हाण ,येथील आगाराची कमी वेळात झालेली प्रगती माझ्या एकट्यामुळे झाली नसुन यात चालक - वाहक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहे यापुढेही भोकर आगाराचे नावलौकिक ठेवण्यासाठी सर्वांनी एकादिलाने काम करावे असे आवाहन करून मला जे भरभरून प्रेम मिळाले ते मी विसरणार नाही असे भावनिक उदगार आगारप्रमुख आर. वाय. मुपडे यांनी निरोप समारंभात व्यक्त केले. 

भोकर तालुक्यातील रेणापूर शिवारात गांजाचे पोते फेकून आरोपी फरार

हिमायतनगरकडून पांढऱ्या कारमध्ये भोकरला जात होता गांजा 

भोकर, मनोजसिंह चौव्हाण, हिमायतनगरकडून पांढऱ्या कारमध्ये भोकरला येणाऱ्या ८ किलो गांजाची तस्करी करणाऱ्यांचा पोलिसांनी पाठलाग केला. दरम्यान आरोपीं रेणापूर शिवारात गांजाचे पोते फेकून फरार होण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने पुन्हा गांजाची तस्करीचा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले आहे.

पोलीस अधिक्षक मिना यांच्या पथकाची किनवट पोलीस हद्दीत मटका अड्यावर धाड

नांदेड, पोलीस अधिक्षकांच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष करीत किनवट भागात मटका, जुगार व अवैद्य दारू विक्रीचा गोरखधंदा खुलेआम सुरू आहे. याबाबतची खबर पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांना प्राप्त झाल्यावर त्यानी याची खात्री करून पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने किनवट भागातीळ विद्यमान आ. नाईक यांच्या गावात धाड मारून एका मटक्याचा अड्डा उद्धवस्त केला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील महिन्यात

Bhokar Polisani Pakadala Ganja गांजाफेकून आरोपी फरार

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com