भोकर तालुक्यातील रेणापूर शिवारात गांजाचे पोते फेकून आरोपी फरार

हिमायतनगरकडून पांढऱ्या कारमध्ये भोकरला जात होता गांजा 

भोकर, मनोजसिंह चौव्हाण, हिमायतनगरकडून पांढऱ्या कारमध्ये भोकरला येणाऱ्या ८ किलो गांजाची तस्करी करणाऱ्यांचा पोलिसांनी पाठलाग केला. दरम्यान आरोपीं रेणापूर शिवारात गांजाचे पोते फेकून फरार होण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने पुन्हा गांजाची तस्करीचा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले आहे.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दि. १८ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास भोकर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पो.नि.संदीपान शेळके हे आपल्या ताफ्यासह हिमायतनगर शहराकडे रवाना झाले. त्यांना रस्त्यात पांढऱ्या रंगाच्या ३ गढ्या आढळल्या, परंतु यात कोणताही माल आढळला नाही. दुसरी एक पांढरी कार रस्त्याने येताना दिसली. तिचा संशय आल्याने पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी न थांबता आरोपीतांनी गाडी धूम स्टाईलने पळविली. त्यामुळे पोलिसांना सादर गाडीचा पाठलाग करावा लागला. भरधाव सुटलेली पांढरी गाडी हि बटाळा शेडकडे घुसली, पोलीस मागेच बटाळा मार्गे रेणापूर मध्ये सदर गाडीमागे होते. याची जाणीव झालेल्या आरोपीतांनी पांढऱ्या गाडीतून गांजाने भरलेले पोते उसाच्या शेतात फेकून पाल काढला.

पोलीस गाडी रेणापूर भागात पोचेपर्यंत आरोपी कुणीकडे फरार झाले हे समजले नाही. यावेळी पोलिसांना कुणीतरी अज्ञातांनी फोन करून कुणीतरी येथे पोते फेकल्याची माहिती दिली. यावरून घटनास्थळी पोचून पाहणी केली असता या पोत्यात ८.५० किलो गांजा अंदाजित किंमत १७ हजार २०० रुपयाचा असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय वाळके, नायब तहसीलदार जगताप यांनी भेट दिली. सादर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुशील चव्हाण पोहेकॉ.पांचाळ, श्रीरामे, साबळे आदींनी परिश्रम घेतले.

जिल्हाभरात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांचे विशेष पथक धडाकेबाज कार्यवाही करीत असताना भोकर शहरासह तालुक्यात अवैद्य धंद्यांनी कळस मंडल आहे. आगामी काळात यावर संभाव्य कार्यवाही होऊ नये म्हणून कि काय..? पोलिसांनी आज गांजाची हि कार्यवाही केली..? असावी अशी चर्चा शहर व परिसरात सुरु आहे. असे असले तरी भोकर तालुक्याकडे विशेष पथकाचे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकातून उमटत आहेत, याची दखल पथक प्रमुख ओमकान्त चिंचोलकर घेतील काय..? हे आगामी काळात दिसून येणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी