आता नांदेडकरांना मिळणार एक दिवसा आड पाणी पुरवठा

नांदेड, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापरही कमी प्रमाणात होत आहे तसेच विष्णुपूूरी प्रकल्पात पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ झाली असून नांदेडकरांना आता 20 जून रोज मंगळवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस होत असून याचबरोबर विष्णुपूरी जलाशयाच्या वरील भागात
सततचा पाऊस व जोरदार पाऊस होत असल्याने विष्णुपूरी जलाशयाच्या साठ्यात पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नांदेडकरांना आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून 20 तारखेपासून एक दिवसाआड करण्यात आला आहे. यामुळे नांदेडकरांनी पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा. विशेषत: नांदेडकरांना उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले नाही. नांदेडकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून उन्हाळ्याचे दिवस काढले असले तरी येणाऱ्या दिवसातही नांदेडकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी