शहरात लवकरच मोफत वायफाय सेवा - खा.अशोकराव चव्हाण

नांदेड, नांदेड जिल्हा दूरसंचार सल्लगार समितीची बैठक समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत वायफाय सेवासह इतर विषयावर चर्चा करण्यात आली. 

नांदेड जिल्हा दूरसंचार समितीची बैठक दूरसंचार कार्यालयाच्या बैठक दालनात समितीची अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत समितीचे सदस्य माणिक पेंटे, बचूराज देशमुख, संभाजी
भिलंवडे,  मुमतोजिद्दन हे उपस्थित होते. प्रथम महाप्रबंधक आर. बी. मादले यांनी सर्वांचे स्वागत करुन मागील वर्षाचा दूरसंचार विभागातर्फे विविध कामे राबविल्याबद्दल त्याचा आढावा सादर केला. यावेळी समितीच्या सदस्यांनी दूरसंचारच्या ब्रॉडबेंड, मोबाईल यांच्यात उदभवणाऱ्या समस्येबद्दल चर्चा करुन सेवा सुधारण्याबद्दल तसेच संपूर्ण जिल्ह्यात 3 जी सेवा चालू करण्या करीता टॉवर उभारण्याच्या सुचना दिल्या. यावेळी खा.चव्हाण यांनी शहरात मोफत वायफाय सेवा उभारण्याचे निदर्शित केले व त्यासाठी त्यांनी आपल्या खा.निधीतून 15 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. यामुळे शहरातील वर्कशॉप, यशवंत कॉलेज परिसर, गुरुद्वारा चौरस्ता, विद्यापीठ परिसर, देगलूर नाका भागात वायफाय सेवा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्याव्यात अशा सुचना दिल्या. केंद्र शासनाकडून प्रत्येक ग्राम पंचायतीला इंटरनेट सेवा जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील ग्राम पंचायतीला लवकरात लवकर जोडून इंटरनेट सेवा सुरू करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी