पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाचे बिलोलीत चार ठिकाणी छापे

धडाकेबाज कार्यवाहीने बिलोली शहर हादरले
हप्तेखोर पोलिसांचे निघाले धिंडवडे
नांदेड, अनिल मादसवार.... नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्याच्या हप्तेखोर पोलीस अधिकाऱ्यांमुळे खुले आम चालणाऱ्या दोन जुगार अड्यावर, हॉटेल मराठवाडा आणि एक दारू अड्डा अश्या चार ठिकाणी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने छापे टाकले असून, २९ आरोपीसह दुचाक्या, मोबाईल, दारूचा साठा आणि गैस सिलेंडर असा असा जवळपास पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या धडाकेबाज कार्यवाहीमुळे बिलोली शहर हादरले असून, पोलीस अधीक्षकांचे आदेश धुडकावून अवैद्य धंद्यांना मूकसंम्मती देणाऱ्या हप्तेखोर पोलिसांचे धिंडवडे निघाले आहेत. विशेष पथकाची कार्यक्षमता बोलिलीच्या अकार्यक्षम पोलीस निरीक्षकावर कार्यवाहीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.      

तेलंगणा - मराठवाडा बॉर्डरवर असलेल्या बिलोली शहर हे सोन्याचे अंडे देणारे शहर म्हणून संबंध जिल्ह्याला परिचित आहे. कारण या ठिकाणी असलेल्या रेतीघाटावरून दररोज कोट्यावधीचा रेतीचा उपसा माफियांच्या मार्फत केला जातो. त्यामुळे बिलोलीचे पोलीस स्थानक मिळावे यासाठी नव्याने आलेले प्रत्येक पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लोटांगण घालून शर्तीचे प्रयत्न करतात असे पोलीस दलातील जुने - जाणकार सांगतात. या ठिकाणी सध्या हिमायतनगर, नांदेड कंट्रोल रूम असा प्रवास करत बिलोलीचे पोलीस स्थानक मिळविण्यात सुरेश दळवे नामक पोलीस निरीक्षकाने यश प्राप्त केले. या ठिकाणी बदलून गेल्यापासून आपली चांदी करून घेतली असल्याची चर्चा बिलोली शहरात व जिल्हाभर सुरु आहे. त्यामुळे बिलोली येथील रेतीचे प्रकरण गेल्या महिनाभर सर्वच वर्तमान पात्रात  झळकले होते. गेल्या महिन्यात नांदेड जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेले चांद्रकिशोर मीना यांनी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैद्य धंदे बंद करून माफियांच्या मुसक्या आवळा अश्या सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवत बिलोली येथे कार्यरत पोलीस निरीक्षकाने खुले आम अवैद्य धंद्यांना छुट दिली आहे. 

याची माहिती विशेष पथकाला गुप्त खबरयांमार्फत मिळाल्यांनतर त्यांनी पोलीस पथकाचा ताफा घेऊन आज दि.२० रोजी नांदेड जिल्हातील बिलोली तालुक्यातील मौजे भोसी येथे एका झाडाखाली मारोती शिकारे यांच्या प्लॉटवरील टिनशेडमध्ये झन्ना - मन्ना नावाचा जुगार सुरु असलेल्या अड्ड्यावर पथक प्रमुख ओमकान्त चिंचोलकर पोकॉ. लाठकर, नीरने, पायनापल्ले, जगताप, जिंकलवार, गंगुलवार, वानखेडे आदींनी छापा मारला. यावेळी पत्त्यावर एकूण १७ जण जगात खेळात व खेळवीत असल्याचे दिसून आले. पथकांचा छापा पडल्याचे  समजताच काही जुगार्यांनी धूम ठोकली. मात्र पोलीस पथकातील युवकानी शंकर रामा दोनकोटे वर्ष ६०, दिगंबर गंगाराम हाळे वय ६०, देविदास गंगाराम शिकले वय ३०, शंकर धोंडिबा देवकर वय ६०, गंगाधर चंदन मंगनाळे वय ३२, रामा उजलाजी गुरंदे वय ४५, साईराम देवकर वय २७, उत्तम शंकरराव हाके वय ३५, मारोती प्रभत्ता शिकारे वय ५०, राजेश लक्ष्मण आगपत्रे वय २७, प्रधान गंगाराम देवकरे वय २५, महादू हिरवा निदानपुरे वय ५५, अर्जुन प्रभाजी देवकरे वय ५०, बंटी गोविंद कांबळे वय २५, मारोती बालाजी मंगनाळे वय १९, देविदास रामराव डाके वय ४२, रामकृष्ण साईराम देवाले वय २० अश्या १७ लोकांना ताब्यात घेतले. यांच्याकडून ०१ लाख ३९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल, दोन दुचाक्या, १० मोबाईल जप्त करून मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद चिंचोलकर यांनी दिली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
       

दुसऱ्या कार्यवाहीत बिलोली ते कुंडलवाडी रस्त्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ०८ जुगार्यांना ताब्यात घेतले. यात अब्दुल वहाब अब्दुल मन्नान वय ४०, सययद निसार अहेमद वय २५, शेख अन्सार शेख अहेमद वय २७, शेख शादुल्ला शेख जैनोद्दीन वय ३८, शेख अर्शद मौनोद्दीन वय २७, सुरेश गंगाधर जगले वय ३०, शेख सद्दाम शेख मकदूम वय २२, शेख मोबीन शेख सलीम वय ३१ सर्व रा. बिलोली, यांना अटक करून ५ मोबाईल १७ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिसरी कार्यवाही येथील हॉटेल मराठवाडा वर करण्यात आली असून, या ठिकाणी अवैदपणे घरगुती वापराच्या गॅसचा हॉटेल मध्ये व्यावसायिक वापर करताना मिळून आले. यावरून अब्दल मतीन अब्दुल बशीर वय ५७ रा.बिलोली, अर्जुन गंगाधर पवार रा.अर्धापूर या दोन आरोपीवर कार्यवाही करण्यात आली आहे. याठिकाणी २ इंडियन गॅस टाक्या १० हजार असा मुद्देमाल जप्त केला आहे. चौथी कार्यवाही करून  ५ हजार ५०० रुपयाची देशी दारू जप्त करून २ आरोपी अटक करण्यात आले आहेत. एकच दिवशी बिल्लोळीमध्ये चार ठिकाणी छापे मारण्यात आल्याने अवैद्य धंदेवाल्यांची झोप उडाली असून,येथे कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचे पितळे उघडे पडले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी