महसुल विभागाच्या इमारतीत अतिक्रमण केलेल्या कुटूंबाना पोलिसांच्या मदतीने सदनिका केल्या खाली-NNL

नांदेड। कौठा परिसर बांधण्यात आलेल्या महसुल विभागाच्या इमारतीतील अनेक सदनिका काही कुटुंबियांनी बळजबरी ताब्यात घेवून त्यामध्ये बस्तान मांडले होते. त्यामुळे  तहसीलदार किरण अंबेकर यांनी महसुल विभागाच्या पथकासह पोलिसांच्या मदतीने सदनिकेवर ताबा मिळविलेल्या कुटूंबियांना २१ फेब्रुवारी रोजी बाहेर काढून सदनिका  पोलीस प्रशासनाचा साह्याने खाली करून घेतल्या व ईमारत प्रवेशद्वाराला कुलुप लावण्यात आले.

कौठा परिसरातील बॉम्ब शोधक व पथक कार्यालयाच्या समोरील बाजुला महसुल विभागाच्या टोलजंग इमारती उभारण्यात आल्या,यामध्ये पोलिस प्रशासन व महसुल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध आहेत. परंतू सध्या एकाही कुटूंबाने या सदनिकेत प्रवेश केलेला नाही. काही दिवसापुर्वी येथील सदनिकेच्या साहित्यांची नासधुस करुन काही साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 

 सदर सदनिकेवर अनेक कुटूंबानी काही दिवसापुर्वी सदनिका ताब्यात घेवून त्यांनी संसार थाटला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या आदेशावरुन तहसीलदार किरण अंबेकर यांनी यापुर्वी संबंधितांना सदनिका रिकाम्या करण्याबाबत काही दिवसाची सवलत दिली होती. परंतू अतिक्रमीत कुटूंबानी आम्हाला जोपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही,असा निर्णय घेतला होता.           

अखेर तहसीलदार किरण अंबेकर,नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी नागमवाड, तलाठी मनोज देवणे यांनी ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व उपनिरीक्षक बी.के.नरवटे,  भगवान गिते,शेख उमर,राजु हुमनाबादे, स्वामी, चौधरी,शंकर बिरमवार,सुनिल गटलेवार, कांबळे,झुंजारे,मांगुळवार, महिला पोलिस ज्योती कंधारे, यांच्या सह महिला व पोलिस फौजफाट्याच्या मदतीने सदनिकेवर अतिक्रमण करणा-यांना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी  बाहेर काढून सदनिका रिकाम्या केल्या व  ईमारत प्रवेशद्वाराला कुलुप मंडळ अधिकारी नागरवाड व तलाठी मनोज देवणे यांनी कुलुप लावले. सकाळ पासुनच मोठ्या प्रमाणात महसूल विभाग व पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी