भोकरमध्ये ६७ हजाराची देशी दारू जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कार्यवाही
 
भोकर, मनोजसिंह चौव्हाण... शहरातील किनवट रस्त्यावरील एका शिवारात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकुन अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने ठेवलेली ६७ हजाराची देशी दारू जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. या कार्यवाहीने उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिस प्रशासनाच्या कारभारावर शंका व्यक्त केल्या जात आहे. 

मुख्य रस्त्यावरील देशी आणि विदेशी दारूची दुकाने
बंद झाल्यानंतर अवैध दारू विक्रेत्यांनी भोकर शहरासह परीसरात थैमान घालुन दारूची खुलेआम विक्री सुरूच ठेवली आसतानाही याठिकाणी कार्यरत आसलेले उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत ठोस कार्यवाही करण्याचे सौजन्य दाखवित नसल्याने नांदेड येथील पोलिस प्रशासनाच्या विशेष पथकाला किंवा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकास भोकर येथील अवैध धंद्यावर लक्ष ठेवुन कार्यवाही करावी लागत आहे शहरातील किनवट रस्त्यावरील किन्हाळा शिवारात एका पत्राच्या टिनशेड मध्ये अवैध दारु साठा असल्याची गुप्त माहिती  मिळाल्यानंतर गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने २०जून २०१७रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता सुमारास टाकलेल्या धाडीत देशी दारु भिंगरीचे २७ बॉक्स( १८० एम एल च्या १२९६ बाटल्या ) ज्याची एकुण किंमत ६७ हजार ३९२ रुपये  असा मुद्देमाल जप्त करुन नरेश नागनाथ कोंडलवार व शे.अहेमद शे.मिरासाब दोघे रा.भोकर यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक सदानंद वाघमारे यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलीसात गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईत पोहेका नागोराव पुंडगिर, सुरेश मेहकरकर, चालक कानगुले सोमाजी यांचा पथकात समावेश आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी