खा.अशोक चव्हाणांच्या प्रयत्नाने नांदेडात पासपोर्ट कार्यालयास मंजुरी

नांदेड, अनिल मादसवार - देश- विदेशात नौकरी, व्यवसाय , पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता नांदेड शहरातच पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. तसेच यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे काल मंजूर झालेल्या यादीत नांदेड शहराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांची पासपोर्टसाठी होणारी परवड थांबणार आहे.


पासपोर्ट मिळविण्यासाठी येथील नागरिकांना नागपूर कार्यालयाच्या चकरा मारून हैराण व्हावे लागत होते. हि बाब लक्षात घेऊन खा.अशोक चव्हाण यांनी परराष्ट्रमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे शहरातील हेड पोस्ट कार्यालयात पी.ओ.पी.एस.के. सुरु करून गरजूंची हेळसांड थांबविण्याबरोबर सहजतेने पासपोर्ट उपलब्ध व्हावे अशी भूमिका घेत नांदेडमध्ये कार्यालय सुरु करण्याची मागणी केली होती. दोन टप्प्यात जाहीर झालेल्या यादीत अनेक शहराची नावे जाहीर झाली मात्र नांदेड शहराचे नाव यातून वगळल्या गेले होते. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते मुन्तजिबुद्दीन यांनी खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी करून लक्ष वेधले, यास गांभीर्याने घेऊन खासदार चव्हाणांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्र शासनाने काळ जाहीर केलेल्या देशातील १४९ नावामध्ये नवीन पासपोर्ट केंद्रासाठी नांदेड शहरातही मंजुरी दिली आहे. खा.अशोकराव चव्हाण यांच्यामाध्यमातून दूरसंचार सल्लागार समिती सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड येथे लवकरच पासपोर्ट कार्यालय सुरु होऊन यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी