NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

मंगलवार, 20 जून 2017

दारुदुकान वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकानी व्यापाऱ्यांची

दुकाने पाडताना हा विषय का घेतला नाही - विनोंद पापीनवार


कंधार, मयूर कांबळे .... नगर पालीकेची सर्वसाधारण सभा दिनांक १९ जुन रोजी पार पाडली. या सभेमध्ये कंधार   शहरातील काही राजकीय लोकांच्या बार व दारु दुकाने वाचवण्यासाठी शहरातील मुख्य रस्ता हस्तांतरीत करुन घेण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी विषय अजिंड्यावर घेतला होता पंरतु यावेळी अपक्ष नगरसेवक विंनोद पापीनवार यांनी आवाज उठवून व्यापाऱ्यांचे दुकाने पाडाल्या जात होती त्यावेळी रस्ता हस्तांरणीत करा असा ठराव का घेतला नाही आज दारुचे दुकान वाचवण्यासाठी रस्ता हस्तांतर.करण्याची गरज वाटत आहे.
अगोदर व्यापाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा मग दारूच्या दुकानांचा विषय घ्या.अशी भुमिका नगरसेवक विंनोद पापीनवार यांनी घेतली असल्याचे त्यांनी पञकार परिषेद मध्ये बोलतांना दिला.                   

अपक्ष नगरसेवक पापीनवार यांनी संपर्क कार्यालयात पञकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी श्री .पापीनवार बोलताना म्हणाले की जनतेनी मला अपक्ष म्हणून निवडुन दिले आहे मी जरी शिवसेनेत प्रवेशा केला असलो तरी मी कुणाचा बांधील नाही. पाच वर्षापुवी व्यापाऱ्यांचे दुकान पाडण्यात आले त्यावेळी हेच नगरसेवक सत्तेत होते त्यावेळी शहरातील रस्ता हस्तांतरीत करण्याचा ठराव घेतला असता तर दुकाने पडाली नसती व.४०० व्यापारी रस्त्यावर आले नसते.परंतु त्यावेळी माञ या कोणत्याच बहादर नगरसेवकांनी हा विषय मांडला नाही. आज शहरातील राजकीय लोकांचे दारु दुकान बंद केल्याने हा रस्ता हस्तांतरीत करण्याचा विषय मांडला जाऊन सभा वायफाळ जाते.अंत्यत दुर्दैवी आहे.आधी येथील व्यापाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा.अशी भुमिका विनोद पापीनवार यांनी न.पा.च्या सर्वसाधारण सभेत घेतली असल्याचे त्यांनी पञकार परिषदेत बोलतांना दिला.कोण काय राजकारण करतोय यांचे आपणास काही देणे घेणे नसून मी व्यापाऱ्यांच्या बाजुने आहे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी संदिप पवार, व्यंकट गव्हाणे, राजु नरंगले, सचिन पा.जाधव ,चंद्रकात मामडे, कृण्णा चालिकवार, मिंलिद महाजन, अमोल पापीनवार, सतिश व्यास, आदिची उपस्थिती होती. 

कोई टिप्पणी नहीं: