२ लाखाचा माल जाळला
लोहा, शहरातील गुटख्यावर मागील आठ दिवसापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी धाड टाकली. २ लाख ५ हजाराचा माल जप्त केला अन्न निरिक्षक यांच्या पंचनाम्या नंतर या गुटख्याची पोलीस ठाण्यात होळी करण्यात आली.
शहरातील एका गुटखाविक्री दुकानावर नव्यानेच रूजू
झालेले स.पो.नि. विठ्ठल पाटील यांनी धाड टाकली. पाच दिवसानंतर अन्न निरीक्षक व्ही. आर. कावळे यांनी पंचनामा केला सहाय्यक बालाजी सोनटक्के सोबत होते. सायंकाळी पोलीस ठाण्यात सपोनि विठ्ठल पाटील सपोनि अमोल धस यांच्या उपस्थीतीत गुटख्याची होळी करण्यात आली. जमादार सोनकांबळे, भागानगरे, श्री राठोड, टोम्पे, रमेश मुधोळकर, पल्लेवाड, जायभाये यासह कर्मचारी उपस्थीतीत होते.