बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे किडस्‌ किंगडम शाळेत प्रात्यक्षीक...NNL


नांदेड|
शहरातील किडस्‌ किंगडम हायस्कुल, पासदगाव येथे दिनांक 20.09.2022 रोजी नांदेड पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथका तर्फे प्रात्यक्षीक दाखविण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपकरण कसे हाताळतात या बाबत विद्यार्थ्याना माहिती देण्यात आली. 

एखादी घटना घडली, बेवारस बॅग वस्तु आढळुन आल्यास बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळावर बोलविण्यात येते. सदर पथक घटनास्थळावर जाऊन कशा प्रकारे कार्यवाही करते या बाबत विद्यार्थ्याना प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. नांदेड पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकात काम करणारे श्‍वॉन सिबा यांचेकडुन प्रात्याक्षिक करून दाखण्यात आले. बेवारस वस्तु कशा पध्दतीने हातळली जाते या बाबत माहिती देण्यात आली. समाजामध्ये वावरतांना विद्यार्थ्यी व नागरीकांनी कोणती दक्षता घ्यावी. बेवारस व संशायस्पध वस्तु आढळयास कोणती काळजी घ्यावी. 

बीडीडीएसचे पोनि जयप्रकाश गुट्टे यांनी विद्यार्थ्याना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी किडस्‌ किंगडम हायस्कुलचे प्राचार्य श्रीमती माहेश्वरी व स्टाफ हजर होते. बी.डी.डी.एस. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे शाळेतर्फे झाडाचे रोप देवून स्वागत करण्यात आले. सदर प्रात्यक्षिक प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड, निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्रीमती अश्‍विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड यांचे मार्गदर्शानाखाली बीडीडीएसचे पोलीस अधिकारी जयप्रकाश गुट्टे, पोनि व पोलीस अंमलदार पोकॉ/”माधव पांचाळ, रमेश पावडे, राम कोल्हे, शंकर जाधव, चालक पोना/”शैलेश शिरसे यांनी सहभाग घेतला आहे.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी