पंचायतराज समितीने जिल्हा परिषदेच्या सीईओला

दिली करणे दाखवा नोटीस 
नांदेड, जिल्ह्यामध्ये मनरेगा अंतर्गत मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे झाले असले तरी तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. राज्य विधीमंडळाचे पंचायतराज समिती नांदेड दौऱ्यावर येऊन त्यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमीततेवर बोट ठेवले होते. यामध्ये तत्कालीन सीईओ अभिमन्यू काळे यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता, यांची चौकशी करण्यात यावी असे आदेश पंचायतराज समितीने दिली असतानाही चौकशी का करण्यात आली नाही. असा सवाल करीत समितीने जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना कारणेदाखवा नोटीस बजाविली आहे.


राज्य विधीमंडळाची पंचायतराज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर विविध कामाचा आढावा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी आली होती. यात प्रामुख्याने मुखेड तालुक्यात मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी या समितीतील आमदार सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीत मनरेगाअंतर्गत झालेले बंधाऱ्याची कामे, विंधन विहीर, नाला सरळीकरण, गाळ काढणे याचबरोबर अशा विविध कामांची पाहणी या समितीने केली होती. या कामामध्ये  अनेक ठिकाणी अनियमीतता असल्याचे प्रत्यक्षदर्शनी समितीच्या सदस्यांना पाहण्यास मिळाले. यामुळे समितीने संबंधीत अधिकाऱ्यांना यामध्ये दोषी ठरवून त्यांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. विशेषत: तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यावर देखील समितीने ठपका ठेऊन त्यांचीही चौकशी करण्यात यावे असे आदेश दिले होते. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषदेचे सीईओ अशोक शिनगारे यांना कामात निष्काळजीपणा केल्या प्रक रणी कारणेदाखवा नोटीस बजाविली असल्याचे समोर आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी