धार्मिक व सामाजिक बंधुभाव इफ्तेहार पार्टीतून जोपासल्या जातो- संजय भोसीकर

कंधार, मयूर कांबळे तालुक्यातील पानभोसी या गावी दि 18 रोजी सायंकाळी रमजान चे औचित्य साधुन माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी इफ्तेहार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी धार्मिक सलोखा जोपासण्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपापल्या पद्धतीने काम करावे त्यामुळे धार्मिक व सामाजिक बंधुभाव इफ्तेहार पार्टीतून जोपासल्या जाऊ शकतो असे प्रतिपादन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी बोलताना केले.


पानभोसी येथे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून इफ्तेहार पार्टीचे आयोजन केल्या जाते.व सामाजिक एकोपा जोपासण्याचे काम भोसीकर कुटुंबियांन कडून केल्या जाते.इफ्तेहार पार्टीचे औचित्य साधून गावातील सर्व मुस्लिम बांधवाना बोलऊन त्यांना इफ्तेहार पार्टी दिल्या जाते.यावेळी या पार्टीमध्ये उपस्थित जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर,हमीद्दोदिन मौलीसाब,सरपंच मनमंथ नाईकवाडे,शेख बापुसाहेब,शेख पाषापाटिल,गजानन नाईकवाडे,शेख निजाम,शेख एजाज,बालाजीराव भातमोडे,विश्वाभंर डुबुकवाड,शेख इसाक,पोलीस पाटील माधवराव कांबळे,शेख जीलानी,शैलेश भोसीकर,शेख रशीद व आदींची प्रमुख उपस्थिती होते.

यावेळी संजय भोसीकर यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की,सामाजिक सलोखा जोपण्यासाठी प्रत्येक मनुष्याने धार्मिक बंधुभाव व सामाजिक बंधुभाव जोपासणे ही काळाची गरज आहे आणि तोच आमचा धर्म आहे आणि तो आम्ही जोपासु व इतरांनी देखील तो जोपासावा यामुळे समाजात एकोपा निर्माण होईल व आपल्या नंतरची पिढी एकोप्याने वावरले व समाजात शांततेचे वातावरण निर्माण होईल त्यामुळे   प्रत्येक मनुष्याच्या जीवनात सुख,समाधान येईल असे ते म्हणाले.यावेळी मजीद मध्ये त्यांना इफ्तेहार पार्टी देऊन भोसीकर यांच्या निवासस्थानी जेवण्याची सोय करण्यात आली होती.या इफ्तेहार पार्टीमुळे गावातील सामाजिक एकोपा निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी