नांदेड| मराठवाड्यातून तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे असून, याचा लाभ सर्व भाविक भक्तां व्हावा हा उद्देश आहे.
गाडी क्रमांक 07609 पूर्णा-तिरुपती विशेष गाडी:- ही विशेष गाडी पूर्णा येथून दिनांक 03 जुलै ते 28 ऑगस्ट, 2023 दरम्यान दर सोमवारी सकाळी 10.25 वाजता सुटेल आणि परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, बिदर, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, पगीडीपल्ली, नालगोंडा, मिर्याल्गुदा, नदीकुडे, सत्तेनापल्ली, गुंटूर, तेनाली, बापटला, चिरला, ओंगोल, कावली, नेल्लोर, गुडूर, रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07610 तिरुपती-पूर्णा विशेष गाडी:- ही विशेष गाडी तिरुपती येथून दिनांक 04 जुलै ते 29 ऑगस्ट, 2023 दरम्यान दर मंगळवारी दुपारी 15.10 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच पूर्णा येथे बुधवारी दुपारी 14.30 वाजता पोहोचेल. या गाडीत स्लीपर, जनरल, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, वातानुकुलीत द्वितीय श्रेणी असे एकूण 18 डब्बे असतील.