दवणे पेट्रेल पंपावरील भेसळ प्रकरणाची कार्यवाही थंडबस्त्यात....

प्रयोगशाळेकडे पाठविन्यासाठी घेतलेले नमुने बदलल्याचा संशय
 
हिमायतनगर, दवने पेट्रोलपंपावर रॉकेल मिश्रीत पेट्रोलच्या तक्रारीनंतर दि.०४ मे २०१७ रोजी हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार डि.एन. गायकवाड यांनी चौकशी करून पेट्रोलचे सैंपल प्रयोग शाळेच्या तपासणीसाठी घेतले खरे. दीड महिन्याचा कालावधी लोटला असताना अद्याप कार्यवाही थंड बस्त्यात पडली आहे. त्यामुळे प्रयोगशाळेकडे पाठविन्यासाठी घेतलेले नमुने बदलून कार्यवाही दडपण्याचा प्रकार होत असल्याचा संशय नागरीकातून व्यक्त केला जात आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू झालेले नांदेड किनवट रोडवर दवणे पेट्रोल आहे. या पंपावर भेसळयुक्त व मापात बनवेगिरी करून पेट्रोल विकत असल्याच्या अनेक दिवसांपासुन नागरिकांच्या तक्रारी होत आहेत. वाढते प्रदूषण व गाड्यांमध्ये होत आसलेली बिघाड यामुळे नागरिक हैरान झाले आहेत, याबाबतची ओरड करूनही स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. सर्व सामान्य नागरिक कशाला भानगडी म्हणून थेट तक्रार करण्यास धजावत नाहीत, त्यामुळे दैनिक गावकरीचे पञकार साईनाथ धोबे यांनी स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून अगोदर याची खातरजमा केली. पेट्रोल सदृश्य पदार्थ असल्याचे लक्षात आल्यानंतर हि बाब पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार डि.एन.गायकवाड यांना सांगून चौकशीची मागणी केली. यावरून ०४ मे बुधवारी दुपारी पेट्रोल पंपावर येऊन पाहणी केली. तसेच चार वेगवेगळ्या बॉटलमध्ये पेट्रोलचे नमुने घेण्यात आले होते. सदरचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविणार असल्याचे सांगितले. परंतु  यास दीड महिन्याचा कालावधी लोटला असताना अद्याप तपासणी अहवाल आला नसल्याने पेट्रोल पंपाची चौकशी गुलदस्त्यात ठेवल्याची चर्चा शहरात सुरु आहे. एकीकडे पेट्रोलच्या भेसळीवर धडक कार्यवाही होत असताना, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील स्थानिक महसूल अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे पेट्रोलमध्ये केरोसीनचे मिश्रण करून, आणि मापात बनवेगिरी व घोटाळा करून पेट्रोल पंप चालक मालामाल होत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. 

याबाबत तक्रारकर्ते साईनाथ धोबे यांच्याशी संपर्क साधला असते ते म्हणले कि, मी दोन वेळा गायकवाड याना विचारानं केली. तिसऱ्यांदा नमुने तपासणीला पाठविल्याचे सांगितले. मात्र अजूनही याबाबतचा कोणताही अहवाल आला नाही. त्यामुळे कार्यवाहीबाबत शंका निर्माण झाली असून, पेट्रोल पॅम्पचालकच्या बचावासाठी हा खटाटोप केला जात असल्याचे म्हणण्यास वाव आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी