NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

सोमवार, 19 जून 2017

धानोराच्या सरपंच पदी सत्वशिला भेंडेकर यांची निवड

नरसी फाटा, नायगाव तालुक्यातील धानोरा ( त.मा.) येथील सरपंच मागील एक महिन्यापूर्वी  आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने बुधवारी येथील नव्याने  संरपच पदाची निवड करण्यात येवून गोविंद पाटील धानोरकर यांच्या गटाच्या सरपंच म्हणून  सत्त्वशीला नागोराव भेडेकंर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आ.वंसतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांखाली धानोरा या गावची ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध होऊन सरपंच म्हणून माधव भेडेकंर यांची निवड झाली होती. सरपंच माधव भेडेकंर यांनी दिनांक  ११  मे रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने  येथील जागा  रिकामी झाली होती. नवीन सरपंच पदाची प्रक्रीया बुधवारी येथील ग्रामपंचायत मध्ये पार पडली. सरपंच  म्हणून गोविंद पाटील यांच्या गटाच्या सौ.सत्वशिला नागोराव भेडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंडळधिकारी श्री.कळकेकर, तलाठी कोकरे, ग्रामविकास अधिकारी कुरूंदे यांची उपस्थिती होती. सौ.सत्वशिला भेडेकंर यांची सरपंच म्हणून निवड झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य गोविंद पा धानोरकर, संकेत कुऱ्हाडे, गंगामणीबाई कुऱ्हाडे, शिवनंदा बोडके, धुप्रतबाई बोडके, सावित्रीबाई बोडके यांच्यासह परमेश्वर पा. कुऱ्हाडे, यशवंत पाटील कुऱ्हाडे, आनंदा पाटील  बाबाराव कुऱ्हाडे, विलास पाटील  कुऱ्हाडे,मारोती पाटील  कंदुरके, मोहन पाटील  कु-हाडे , संजय  कंदुरके, बाबाराव ढेपाळे , व्यकंट गजले , काळबा बोडके, उत्तम पाटील, माजी प.स.सदस्य नागोराव भेडेकंर, किसनराव कुऱ्हाडे, आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं: