पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांची हदगाव तालुक्यात दारूच्या साठेबाजांवर कार्यवाही

नांदेड, हदगाव, हिमायतनगर, तामसा, वाळकी बा.भागात विनापरवाना देशी दारू विक्री करण्याच्या बेताने वाळकी येथे मळवंदे यांच्या घरासमोर ३० बॉक्स, देशी दारू अंदाजित ०१ लाख ४४ हजार, दोन चारचाकी टेम्पो असा एकूण ९ लक्ष रुपयाचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने बुधवारच्या मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास पकडून धडाकेबाज कार्यवाही केली आहे.

मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात
चार ठिकाणी छापे मारून अवैद्य धंदेवाल्याना हादरून सोडणाऱ्या कार्यवाय केल्यानंतर परत नांदेडकड़े येताना पथक प्रमुख ओमकान्त चिंचोलकर याना गुप्त माहिती मिळाली. हदगाव तालुक्यातील वाळकी येथे सर्जेराव सुभाष मळवंदे यांनी अवैद्य विक्री करण्याच्या उद्देशाने दोन टेम्पोमध्ये देशी दारूचा साठा ठेवल्याची गुप्त माहिती समजली. यावरून   विशेष पथकाने मध्यरात्री २.३० वाजता छापा मारला असता पोपटी रंगाचा लिलैंड दोस्ट छोटा हत्ती, एम.एच.२६ ए.डी.७६४५ आणि एक पांढऱ्या रंगाचा टाटा मैजिक छोटा हत्ती क्रमांक एम.एच.२६ ए.डी.८७७३ या दोन गाड्यामध्ये अवैद्य विक्री करण्यासाठी देशी दारूचा माल भरून ठेवलेला होता. याबाबत गाडी क्रमांक ०१ चे सर्जेराव सुभाष माळवंदे वय २३ वर्ष, गजानन हिरामण फसेगावकर वय ३० वर्ष दोघेही रा.वाळकी, तसेच गाडी क्रमांक ०२ मधील गजानन सुभाष माळवंदे वय २१ वर्ष यांची विचारणा केली असता एका गाडीत ९६ हजारच व दुसऱ्या गाडीत ४८ हजारच दारूचा साठा धालून आला. दारूच्या साठ्यासह दोन्ही वाहने असा एकूण १० लक्ष ४४ हजारांचा मुद्देमाल ३ आरोपीसह जप्त करण्यात आला आहे. यांच्यावर बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्यासाठी दोन गाड्यातून दारूचा साठा अवैद्य विक्री साठी पुरवठा करण्याच्या उद्देशाने बाळगून मिळून आल्याबद्दल मुंबई प्रोविशन एकट कलाम ६५ (ई) ८३ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी