पोलीस अधिक्षक मिना यांच्या पथकाची किनवट पोलीस हद्दीत मटका अड्यावर धाड

नांदेड, पोलीस अधिक्षकांच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष करीत किनवट भागात मटका, जुगार व अवैद्य दारू विक्रीचा गोरखधंदा खुलेआम सुरू आहे. याबाबतची खबर पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांना प्राप्त झाल्यावर त्यानी याची खात्री करून पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने किनवट भागातीळ विद्यमान आ. नाईक यांच्या गावात धाड मारून एका मटक्याचा अड्डा उद्धवस्त केला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील महिन्यात
पोलीस अधिक्षकी चंद्रकिशॊर मीना यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैद्य धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा सूचना दिल्या होत्या. परंतु सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या आदेश डावलून खुले आम मटका चालु असल्याच्या गुप्त माहीती खबऱ्याकडून मिळाली. त्यावरून पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या आदेशानुसार दि.१९ सोमवारी दुपारी विशेष पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी दहेली ता. किनवट येथे धाड टाकली. यावेळी मोकळा जागेत तंट्याच्या व टिनशेडमध्ये मटका खेळात व खेळवीत असताना नगदी १० हजार २०० व २ दुचाकी वाहने असा एकुन ४० हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याठिकाणी असलेल्या जीवन वाडगुरे, शिवाजी मोरे, किशोर कांबळे सर्व रा.दहेली व रमेश येरेकर रा. वझरा, रामा मोगरे रा.चिंचखेड, गणपत खामनकर रा. दु॑ड्रा, संजय चव्हान रा. लसनवाडी, जयवत राठोड रा. निचपुर, आनंदराव कनाके रा. सारखनी, जयराम तुमराम रा. चिंचखेड व प्रमोद काळे रा. दहेली या ११ आरोपीना अटक केली आहे. तसेच यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याअगोदरही पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने जुगार, अवैद्य दारू, गुटख्यावर कार्यवाही केली होती. याची माहिती असताना देखील या भागात राजरोसपणे अवैद्य धंदे चालविले जात असल्याने याला अभय कुणाचे असा सवाल या निमित्ताने विचारलं जाऊ लागला आहे.

आरोपी प्रमोद काळेच्या जागेत दहेली येथील मोकळा जागेत एक शेड टाकून ही मटक्याचा अड्डा चालवत होता. दहेली हे गाव किनवट मधील सतत ३ वेळा निवडून आलेले आमदार प्रदीप नाईक यांचे गाव आहे. विशेष म्हणजे स्वतः आमदार या गावात राहतात, त्यांनाही आपल्या गावात काय..? चालले यांची खबर नाही...? याचेच कौतुक वाटत आहे. आमदाराच्याच गावात खुलेआम मटका चालत असेल तर इतर भागातील परिस्थिती काय...? असेल अशी विचारणा यानिमित्ताने सामान्य जनतेतून होत आहे. विदर्भातील आर्णी येथील एक मटका किंग यांच्या अधिपत्याखाली किनवट माहूर तालुक्यात व हदगावमध्ये सुद्धा अशाच प्रकारे मटका चालु असल्याची गुप्त माहिती समोर येऊ लागली आहे. याकडे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांचे विशेष पथकाने लक्ष द्यावे अशी मागणी विशेषतः पतिराजाच्या त्रासाला कंटाळलेल्या महिला वर्गातून केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी