म्हणे 4 लाखांची चोरी मात्र दुजोरा कोणीच देत नाही

नांदेड, रामप्रसाद खंडेलवाल ... नांदेड शहरातील एका बँके समोरून चार लाख रुपयांची बॅग एक चोरट्याने लंपास केल्याची खबर आज दुपारी 4 वाजे पासून व्हाट्सअप या संकेत स्थळावर वायरल झाली पण रात्री 8 वाजे पर्यंत कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.हा ४ लाखांची बॅग चोरणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आज दुपारी व्हाट्सअप या संकेत स्थळावर नांदेडच्या
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक चार लाख रुपयांची बॅग चोरट्याने मालकाच्या डोळा चुकवून लंपास केली असे एक वाक्य प्रसारित झाले.या बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतांना कोणीच अधिकारी आमच्या कडे तक्रार आलीच नाही असे सांगत होते.काही वेळाने हि घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे पेव फुटले.त्यांना माहिती विचारली असतांना ते सुद्धा काहीच सांगण्याच्या स्थितीत नव्हते. अजून काही वेळाने एका चोरांचे चित्र व्हाट्सअप या संकेत स्थळावर झळकले.त्या फोटोत दिसणारा माणूसच चोर असल्याची माहिती त्या द्वारे प्रसिद्ध झाली होती संदर्भाने बरीच माहिती घेण्याचे प्रयत्न केले पण खासच यश आलेच नाही. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी