आभाळ येतोय दाटून...पण पावसाचा पत्ता नाही.....!

दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या; शेतक-यांचे डोळे अभाळाकडे

नरसी फाटा, सुभाष पेरकेवार -मृगनक्षञ निघून आज दहा दिवस होत असून नरसी सह नरसी सर्कल मध्ये  पेरणीयुक्त पाऊस झाला नाही. गेल्या चार दिवसापुर्वी झालेल्या साधारण या पावसानंतर काही शेतकरी पेरणी सुरू केली तर बहुतांश शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. ब-याच ठिकाणी पाऊस बरसतो आहे पण या भागात पेरणी युक्त पाऊस कधी होईल म्हणून शेतकरी अभाळाकडे डोळे लावून बसला आहे. 


गत वर्षी लवकरच पाऊस सुरू झाल्याने पेरण्या सुध्दा लवकर झाल्या होत्या. यावर्षी देखील पावसाचे आगमण लवकर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण मृगनक्षञ सुरू झाल्यानंतर कधी मधी साधारण पाऊस झाला. दि.12जुन रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान नरसीसह परिसरात साधारण पाऊस झाला. यामुळे शेतकरी बि बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. अजून एकादा मोठा पाऊस झाला तर शेतकरी पेरण्या सुध्दा सुरू करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. दररोज आभाळात ढगांची गर्दी पहायला मिळत असल्याने काही शेतकरी पाऊस पडणारच या आशेवर साधारण पावसानंतर  पेरणी सुरू केली.तर बहुतांश शेतकरी आजही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पावसाचे दमदार आगमण कधी होईल हि चिंता शेतक-यांना सतावत आहे .आज जवळपास तिन चार दिवस झाले तरी काही पावसाचा पत्ता नाही. अभाळ दाटून येते आहे आता मुसळधार पाऊस पडतो की काय असे आभाळ बघून वाटते पण काही वेळातच अभाळातील ढग गायब होतात. पण पाऊस काही होत नाही गत तिन चार दिवसात महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे . पण नरसीसह या सर्कल मध्ये माञ पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे या भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी