नाट्यकलावंत मास्टर लक्ष्मण काळेवार यांचे निधन

नांदेड, प्रतिनिधी       आपल्या सशक्त अभिनयाने मराठवाड्यात विशेषतः ग्रामीण भागात ओळख निर्माण करणारे जुन्या पिढीतील नाटय कलावंत मास्टर लक्ष्मण महादू काळेवार यांचे वृद्धपकाळाने काल वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले.

मास्टर या टोपण नावाने ओळखल्या जाणारे काळेवार यांनी गेल्या 35 वर्षापासून नाट्य कलावंत म्हणून कारकीर्द गाजवली. त्यांनी अभिनयाची सुरुवात शाहीर
अण्णा चव्हाण यांच्या प्रेरणा नाट्य मंडळ लोहा या नाट्यसंस्थेपासून केली. सोबतच शाहीर दिगु तुमवाड यांच्या सोबतही काम केले. आजवर त्यांनी, ये गाव लई न्यारं, शुरा मी वंदिले, हा गुन्हा कोणाचा, खुर्ची पायी चाललेली लढाई, नाथा माझा ,घडा भरला पापाचा, बायको मंत्री, नवरा संत्री, बायको बसली डोक्यावर असे त्यांचे एकुण १५० नाट्यप्रयोग लोकप्रिय झालेले आहेत. मास्टर काळेवार यांना राज्यशासनाचा उत्कृष्ट कलावंत सोबतच केरळ शासनाचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या कलावंत शिष्यवृत्तीतही त्यांचा समावेश करण्यात आला होता. उद्या मंगळवार दि.२० रोजी सुजलेगाव ता नायगाव येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सामाजिक, सांस्कृतिक , नाट्य क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी