पतंजली योग समिती तर्फे कंधारमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

कंधार, मयुर कांबळे, आयुष मंत्रालय द्वारा आयोजित दिनांक २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन पतंजली योग समिती कंधारच्या वतीने दरवर्षी प्रमाने याही वर्षी योग दिनाचे आयोजन करण्यात आले . कंधार शहरातील योग प्रेमी साधकांनी शहरातील बालाजी मंदीर भवानीनगर कंधार येथे शांती,कल्याण आणि स्वाथ्यासाठी जगात हा दिवस सर्व धर्म ,पंथ,संप्रदाय विविध सामाजिक संघटनांनी, शासकीय,निमशासकिय कर्मचार्यांनी व विद्यार्थ्यांनी या दिवशी सहभाग नोंदवून आपल्या भारतीय संस्कृतीला सन्मानीत करण्याचे आवाहन पतंजली योग समिती तालुका प्रभारी नीळकंठ मोरे यांनी केले आहे.


बालाजी मंदीर भवानीनगर कंधार येथे दिनांक २१ जून २०१७ रोज बुधवारी सकाळी ५ .०० ते ६.३० या वेळेत सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लोहा / कंधार विधानसभा आमदार प्रताप पाटील चिखलीकर ,जि.प.सदस्य सौ.संध्याताई धोंडगे ,जि.प.सदस्य सौ.प्रणिताताई देवरे ,नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे,माजी नगराध्यक्षा सौ.अनुसयाताई केंद्रे ,प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्रम्हकुमारी ज्योती बहेणजी , भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मुक्तेश्वर धोंडगे ,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, दिलीप दादा धोंडगे , डॉ.श्याम पाटील तेलंग ,पं.स.सदस्य श्री.शिवाभाऊ नरंगले .सत्यनारायण माणसपुरे .ऊत्तम चव्हाण ,भाजपा शहराध्यक्ष, गंगाप्रसाद यन्नावार ,माजी उपनगराध्यक्ष सुधाकर कांबळे ,नगरसेवक शहाजी नळगे , डॉ. दिपक बडवणे, डॉ.रामभाऊ तायडे ,डॉ.भगवानराव जाधव ,डॉ.स्वप्निल रणदिवे ,डॉ.बालाजी मद्रेवार, डॉ. माधवराव कुद्रे ,नायब तहसिलदार सुरेश वडवळकर ,शिवाजी अंबुलगेकर ,पत्रकार संघाचे अध्यक्ष मिर्झा जमीर बेग ,आदीसह मान्यवरांची उपस्थिती रहाणार असून ,या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन पतंजली योग समिती तालुका प्रभारी नीळकंठ मोरे ,गुलाबराव नळगे,संजय वट्टमवार , सचिन मुत्तेपवार,दत्तात्रय एमेकर ,मारोतराव सुवर्णकार,योग शिक्षक कैलास फुलवळे ,सौ.ज्योतीताई नागपुर्णे ,सौ.सिंधुताई कोनाळे ,सौ.सविता वट्टमवार व सौ.संगिताताई बदरखे आदीनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी