पत्रकारितेतील जेष्ठ तारा निखळला....

जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे यांचे निधन

भास्कर काका दुसे यांचा जन्म १४ जून १९२५ साली झाला. गेली ४५ वर्ष ते पत्रकार क्षेत्रात वावरत होते. त्यांनी आपल्या कर्तबगारीने एक ध्येयवाद तथा जेष्ठ पत्रकार म्हणून ओळख निर्माण केली आहे.  वयाच्या ९२ व्या वर्षी मंगळवार दि.२० जून २०१७ च्या रात्री ११.१५ त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने पत्रकारिता क्षेत्रातील एका तारा निखळल्याचे दुःख जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्याला झाले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार हा लेख....


भास्कर दुसे काका हे पत्रकार आणि जेष्ठ भाजप कार्यकारिणीचे सदस्य म्हणून सर्वाना परिचित आहेत. मी त्यांचा पत्रकारितेचा गुरु मानून पत्रकारिता क्षेत्रात प्रदान केले. त्यावेळी त्यानि मला एक गमतीदार आठवण ते सांगितली. नांदेड जिल्ह्यामधून " गोदातीर समाचार " नावाचे एक दैनिक ए.स.१९६२ मध्ये सुरु झाले .जिल्हा पातळीवर एखादे दैनिक सुरु होणे हा ग्रामीण भागातील लोकांना कौतुकाचा विषय होता. लोक उत्सुकतेने पेपर वाचत असत. यामध्ये आपले फोटो , नाव येणे मोठेपणाचे वाटत असे. मग त्यांनी पोस्ट कार्डवर बातम्या पाठविण्याची सुरुवात केली. बातम्या छापून येऊ लागल्याने, त्यांना हा छंद जडला. एके दिवशी एक गरीब वृद्ध गृहस्थ वय ८० असावे घरी धान्य नसल्यामुळे भूक बळी पडला असे समजले. त्यावरून श्री भास्कर दुसे यांनी पोस्ट कार्डवर सविस्तर लिहून पाठविले. सदर बातमी हि ५ कॉलम शीर्षकाखाली " वाढत्या महागाईचा भूकबळी " अशी छापून आली होती. 

ती बातमी इतकी स्फोटक असू शकते याची कल्पना त्यांना त्यावेळी वाटली नसावी. पण त्या बातमीने शासन यंत्रणा खडबडून जागी झाली. कलेक्टर, कमिश्नर, तहसीलदार पासून त्या बातमीची चौकशी सुरु झाली. खूप चर्चा झाली " गोदातीर समाचार " चे संपादक कै. देविदासराव रसाळ (काका) यांची त्यांनी भेट घेतली. घटनेचा सविस्तर वृतांत सांगितला, संपादकांनी " भास्करराव काही काळजी करू नका " मी आहे ना..  आणि हो आज पासून आम्ही तुमची आमचे वार्ताहर म्हणून नेमणूक करत आहोत. अश्या प्रकारे भास्कर दुसे या पत्रकाराचा जन्म झाला. आज पत्रकारांना खूप मान आहे, त्यांना बर्यापैकी संरक्षणही मिळत आहे. पण ४५ वर्षाखाली गावचे पुढारी, अधिकारी, गुंड- पुंड यांच्या विरोधात बातमी देणे सोपे नव्हते. प्रसिद्धी माध्यमावर त्यांचा दडपण असायचे. आज पत्रकारांना ग्लैमर आले आहे. ती प्रोफेशनल झाली आहे, पण ४५ वर्षाखाली ती तशी नव्हती. तर ती " जागल्या " ची भूमिका प्रामाणिकपणे निभावणारी होती. केसरी , नवाकाळ, आदर्श, मराठवाडा हि वृत्तपत्रे त्या काळी पत्रकारांचा आदर्श होती. भास्कर दुसे यांनी पत्रकारिता सामाजिक बांधिलकी म्हणून केली, पैश्याचा मोह त्यांनी कधी ठेवला नाही. अनेकदा त्यांना प्रलोभने देण्याच्या प्रयत्न झाला. हप्ता देऊ करण्यात आला, पण तो त्यांनी नम्रपणे नाकारला. एका गुत्तेदाराने त्यांना गप्प राहण्याच्या संदर्भात पैसे देण्याचा प्रयत्न केल. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले कि, तुम्ही प्रमानिकतेने काम करा, मला ज्यावेळी समाज कार्यासाठी निधी लागेल तेंव्हा ध्या. कारण तुमच्या इमानदारीच्या कमाईत जनतेचा देखील वाट आहे , हे लक्षात ठेवा.

श्री भास्कर दुसे यांच्या बर्याचश्या बातम्यावर विधानसभेत चर्चा झाली आहे. प्रश्न उपस्थित करण्यात आले, काही अधिकार्यांनी पुढार्यांना हाताशी धरून त्यांच्या विरोधात खोट्या बातम्या देऊन त्रास देत असल्याचे एक निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. दुसे काका एक चांगले पत्रकार तसेच लेखकही आहेत. त्यांनी लिहिलेले अनेक लेख गाजले असून, सार्वजनिक ठिकाणी त्यांचे वाचनही झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय लेखाचे २ संग्रह " पडसाद " व " गजर "यासह अटलबिहारी वाजपेयी, माजी आ.चंद्रकांत मस्की, यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक व्यक्तीच्या जीवन चरित्रावरील पुस्तके प्रकाशित झाले आहेत. नांदेडहून निघणार्या साप्ताहिक चक्रपाणीचे त्यांनी संपादक म्हणून २५ वर्ष काम पहिले, तसेच अनिल मादसवार यांनी सुरु केलेल्या ऑनलाईन वेब पोर्टल नांदेड न्यूज लाईव्हचे मानंद संपादक म्हणून ५ वर्ष काम पहिले होते. ग्रामीण भागात राहून भास्कर दुसे यांनी पत्रकारिता केली असून, आज जेष्ठ पत्रकार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. एक सामाजिक जागरण करणाऱ्या व्यसन मुक्तीचे प्रबोधन करणाऱ्या जागरूक समाजसेवक पत्रकाराचे दि.२० जून रोजी २०१७ रोजी निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो हीच नांदेड न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना.                                                                  
संपादक - नांदेड न्युज लाईव्ह 
                                                                 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी