भोकर आगाराची प्रगती कायम ठेवा - आर. वाय. मुपडे

प्रदिपकुमार पोवार नवीन आगारप्रमुख 

भोकर, मनोजसिंह चौव्हाण ,येथील आगाराची कमी वेळात झालेली प्रगती माझ्या एकट्यामुळे झाली नसुन यात चालक - वाहक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहे यापुढेही भोकर आगाराचे नावलौकिक ठेवण्यासाठी सर्वांनी एकादिलाने काम करावे असे आवाहन करून मला जे भरभरून प्रेम मिळाले ते मी विसरणार नाही असे भावनिक उदगार आगारप्रमुख आर. वाय. मुपडे यांनी निरोप समारंभात व्यक्त केले. 


मागील एका वर्षांपुर्वी भोकर आगाराचा कारभार डबघाईस आला होता आर.वाय. मुपडे यांनी आगाराची सुत्रे हाती घेतल्यानंतर एका वर्षाच्या आतच बेशिस्त झालेला कारभार सुधारून आगाराला प्रादेशिक विभागात क्रमांक एकवर आणले पदोन्नती झाल्याने मुपडे यांची नुकतीच बदली झाली त्यांना आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला यावेळी व्यासपीठावर नवीन आगारप्रमुख प्रदिपकुमार पोवार, जेष्ठ पत्रकार एल. ए. हिरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोजसिंह चौव्हाण, दशरथ भदरगे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना मुपडे म्हणाले, मला बेशिस्त पटत नाही अधिकारी म्हणून शिस्त लावणे माझे कर्तव्य होते.आपली साथ मिळाली म्हणून भोकर आगाराचा विकास झाला.तर पदभार स्विकारलेले प्रदिपकुमार पोवार म्हणाले की, मुपडे यांनी भोकर आगारासाठी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे यानंतरही याठिकाणीची शिस्त आणि काम समाधानकारक ठेवण्यासाठी मी प्रयत्न करीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली एस.एम.सोनकांबळे. सुभाष पवार. अशोक चटलावार.यासिनखाॅन.प्रभाकर मोरे. एल.ए.हिरे.दशरथ भदरगे.ताजोद्दीन आदिनी विचार मांडले सूत्रसंचलन श्रीदत चटलावार  यांनी केले या कार्यक्रमास विलास पवार, मारोती चंद्रपाल.बालाजी मदने.विजय सावंत.सी.जि.किनीकर.एल.एस.मुतेपवाड यांच्यासह चालक, वाहक, कर्मचारी यांची उपस्थित होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी