तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन - NNL


नुकत्याच किटकशास्त्रज्ञांनी केलेल्या वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्हयातील सर्वेक्षणानुसार यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे व येत्या पंधरवड्यात हे पिक फुलोऱ्यावर येईल. शेतकरी बंधुना तूर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनावे उपाय करणे आवशक आहे. शेंगा पोखरणा-या अळयांमधे खालील प्रकारच्या अळयांचा समावेष होतो.

१.शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) : या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, विविध रंग छटेत दिसुन येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करडया रंगाची असून तीच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठया अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.

२. पिसारी पतंग : या पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाणे पोखरते.

३. शेंगे माशी: या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातीलदाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

एकात्मिक व्यवस्थापन - या तिनही किडी कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.

1. प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळयाखाऊन फस्त करतात. 2. अळयांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करुन नष्ट कराव्यात. या किडींच्या नियंत्रणासाठी खाली दिलेल्या जैविक/ रासायनिक कीटकनाशके यांचा वापर करावा.

फवारणी  कालावधी

जैविक/ रासायनिक कीटकनाशके

मात्रा/१० लिटर पाणी

पहिली फवारणी  (५०% फुलोरा असताना)

निंबोळी अर्क ५ टक्केकिंवा

५० मिली

अझॅडिरेक्टीन ३०० पीपीएमकिंवा

५० मिली

अझॅडिरेक्टीन १५०० पीपीएमकिंवा

२५ मिली

एच.ए.एन.पि.व्हि (१․ १०पिओबी / मिली)किंवा

५०० एल.ई./ हे

बॉसिलस थुरिंनजिएसिस

१५ मिली

क्विनॉलफॉस २५ ई.सी. किंवा

२० मि.ली

दुसरी  फवारणी  (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानी)

इमामेक्टीन बेंझोएट५ टक्केएस. जी.किंवा

३ ग्रॅम

लॅंबडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाहीकिंवा

१० मिली

ईथिऑन ५० टक्के ईसीकिंवा

४ मिली

क्लोरॅनट्रीनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही

२.५मिली

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी