२०२२ ते २०२७ पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
नांदेड, अनिल मादसवार। नांदेड मर्चंट को - ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२२- २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड पार पडली. त्यानंतर(८डिसें) गुरुवारी अध्यक्ष -उपाध्यक्ष पदासाठी निवड सभा होती. यात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा दिलीप कंदकुर्ते यांची तर उपाध्यक्ष पदासाठी दुसऱ्यांदा लक्ष्मण संगेवार यांची निवड झाली . एकमेव अर्ज निर्धारित वेळेत दाखल झाले त्यामुळे निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून जी.आर कौरवार यांनीं निवड बिनविरोध जाहीर केली.
दि. नांदेड मर्चंट को - ऑपटेव्हिट बँकेच्या २०२२ - २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडवूक बिनविरोध पार पडली यात सर्वसाधारण मतदार संघातून विद्यमान चेअरमन दिलीप कंदकुर्ते, माजी चेअरमन ज्ञानेश्वर दतोपंत महाजन, माजी चेअरमन ज्येठ पत्रकार गोवर्धन बियाणी श्रीकांत भागवत वट्टमवार, रविकुमार शांतीलालजी कासलीवाल, अरुण श्रीहरी चालिकवार, मनिष माणिकचंद काला, दिपक गोविंद चन्नावार, उमेश मधुकरराव जालनेकर, सुनील हरिप्रसादजी मानधनी, गणेश शंकरराव चिटमलवार कैलास मदनलाल राठी या बारा संचालकांची बिनविरोध निवड तर इत्तर मागास प्रवर्गातून विद्यमान उपाध्यक्ष लक्ष्मण संगेवार तर अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात पत्रकार हरिहर धुतमल, विज/भज/ विमा राखीव मतदार संघातून ओमप्रकाश विठ्ठल राखेवार तर महिला मतदार संघातून प्रभादेवी नंदकुमार देव, वसुधा प्रभाकर तगडपल्ले यांची अविरोध निवड झाली. बँकेवर कंदकुर्ते -बियाणी यांचे दीर्घकाळा पासून वर्चस्व आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळाची ८ डिसेंबर रोजी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठी बैठक झाली. सकाळी अकरा वाजता निवड प्रक्रिया सुरू झाली यात बँकेचे ज्येष्ठ संचालक दिलीप कंदकुर्ते यांची अध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले त्यांना . सूचक उमेश जालनेकर, तर अनुमोदक मनिष काला यांनी दिले. उपाध्यक्ष पदासाठी लक्ष्मणराव संगेवार यांचा एकमेव अर्ज आला . सुचक श्रीमती प्रभादेवी देव तर अनुमोदक हरिहर थुतमल होते. निर्वाचन अधिकारी जी आर कौरवार यांनी या दोघांचे अर्ज छाननी नंतर वैध ठरविले व त्याची बिनविरोध निवड झाल्याचेजाहीर केले.दिलीप कंदकुर्ते यांनी सहाव्यांदा बँकेचे अध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली तर प्रभारी अध्यक्ष राहिलेले लक्ष्मण संगेवार यांची दुसऱ्यांदा उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.
निवड प्रक्रियेसाठी बँकेच मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत बुवा , व सहकार अधिकारी एस एस जळके यांनी सहकार्य केले-बँकेचे हे हिरक महोत्सवी म्हणजे साठ वर्ष होत आहे नांदेड जिल्ह्यासह औरंगाबाद, पुणे,यवतमाळ, वाशीम, उदगीर, परभणी, हिंगोली, वसमत अशा राज्यभर २१ शाखा आहेत. बँकेत ६२६ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत ३८८ कोटीचे कर्ज असून एनपीए शून्य टक्के आहे. यदा मार्च २०२२ पर्यंत १४ कोटी रुपये नफा झाला, आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष कंदकुर्ते व उपाध्यक्ष संगेवार यांनी बँकेचे सभासद व संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त केले.त्यांनी पदभार स्विकारला संचालक मंडळ व बँकेच्या वतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.