हदगाव, शे.चांदपाशा| उप -नियंञक वैधमापन शास्त्र अधिकारी यांच्या दुर्लक्षमुळे हदगाव शहरात व तालुक्यात इलेक्ट्निक्स मोजमाप काट्याची वेळेवर तपासणी होत नसल्याने नागरिक ग्राहक व शेतकऱ्यांना या इलेक्ट्रॉनिक्स मोजमाप काट्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
असे असले तरी या बाबतीत कुठे तक्रार करावी. या बाबतीत संबंधित विभागाकडुन ग्रहकांकरिता जनजागृति होत नाही सध्या सुगीचे दिवस असल्याने शेतक-याकडे शेती माल उदा सोयाबीन कापुस आदी धान्य आलेले आहे. शेतकरी सरळ तो आपला कृषि माल व्यापा-याकडे नेत आहे. बहुतांशी व्यापाऱ्याकडे इलेक्ट्रॉनिक्स मोजमाप करण्याचे काटे असल्याने या बाबतीत शेतकऱ्यांना सहसा ज्ञान नसतो. यामुळे या ई-काट्याबद्दल व व्यापा-या विषयी शंका व्यक्त करतांना दिसुन येतात.
पण या गरजेपोटी या बाबतीत तो काही बोलु शकत नाही. शहरात व ग्रामीण भागात बहुसंख्य व्यापाऱ्याकडे ई-काट्याचा सर्वात जास्त वापर होतांना दिसुन येत आहे या बाबतीत उपनियंञक वैधमापन शास्ञ कार्यालय नादेड शी माहीती घेतली असता त्यांच्या माहीतीनुसार या तिन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स काट्यात खोडतोड केलेल्या अश्या एका ही... व्यावसायिकावर कारवाई केली नसल्या बाबतीत माहीती देण्यात आली वर्षातुन एकदा तरी ह्या इलेक्ट्रॉनिक्स वजन मापे काट्याची पडताळणी होणे अत्यावश्यक असतांना माञ संबंधित विभाग नेमके काय करित असावे असा प्रश्न शेतकरी नागरिक व ग्राहक यांना पडलेला आहे. हदगाव व परिसरात कधीतरी वैधमापन कार्यालयाचे अधिकारी या भागात भेट दिल्याचे दिसुन येत नाही. यामुळे या इलेक्ट्रॉनिक्स मोजमाप काट्यात पाप तर होत नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.