ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्यावी - शेकाप -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता आलेलख घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे मुखेड तालुकास जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई. द्यावी अशी मागणी शेकापचे भाई आसद बल्खी मुख्यमंत्री यांना मागणी केली आहे. 

 जिल्हाभरात गेल्या पंधरवड्यात अर्थात 11 जुलै पासून सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन,मूग, उडिद, बाजरी, कापुस या पिकांचे अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. असून आलेले पीक अवेळी पडलेल्या पावसामुळे वाया गेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पीके पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखाे रुपयांचे नुकसान हाेवून बळीराजा हवालदिल झाले आहेत.

 शासनाने नुकसानींचे प्रत्यक्ष बांधावर जावून अद्यापही पंचनामे केले जात नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहे. ५० टक्क्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.

अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे व रस्त्यांसह सर्वच पातळीवरील नुकसान पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेकापचे भाई आसद बल्खी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई - मेल द्वारे मागणी केली आहे.

2 Comments

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी