नांदेड केंद्रवील स्पर्धा जल्लोषात संपन्न -NNL


नांदेड|
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड केंद्रावर अभिनव भारत शिक्षण संस्था, नांदेडच्या वतीने प्रा. दिलीप परदेशी लिखित, डॉ. मनीष देशपांडे दिग्दर्शित “काळोख देत हुंकार” या नाटकाने संपन्न झाली एकूण चवदा दिवस चाललेल्या या स्पर्धेत एका पेक्षा एक सरस नाट्य प्रयोगांचे सादरीकरण झाले. यावर्षी तब्बल चार नाटकांनी हाऊसफुल गर्दी खेचली होती. याचाच आर्थ आता नांदेड केंद्रावरील स्पर्धेतील नाटकांची गुणवत्ता वाढली आहे असे म्हणण्यास हारकत नाही.

स्पर्धेतील हाउसफुल्ल गर्दी खेचून समारोप करणारे नाटक “काळीज देत हुंकार” हे मानवी मनाची भूक व तनाची दाहकता यांचा मेळ साधून त्याला वास्तविकतेची झालर लावून आणि विविध रंगांचा जोड देऊन लेखकाने काळोखाची शाल नकळत प्रेक्षकांच्या मनावर पांघरली आहे, त्यात भुकेची वास्तविकता आहे, प्रेमाची दाहकता आहे, विचारांची कोमलता आहे आणि स्वभावातील कटुताही आहे. माणसाची भूक भागवण्यासाठी भाकर पाहिजे, भाकर मिळवण्यासाठी पेसा पाहिजे आणि पेसा मिळवण्यासाठी हाताला काम पाहिजे, हे काम मिळवण्यासाठी पोटातील भूक माणसास कोणत्याही स्तराला जाण्यास भाग पाडते आणि याचाच फायदा घेऊन शोषित लोकांनी वेग वेगळ्या पद्धतीने अन्याय करत स्वतःचे सिंहासन गोर गरिबांच्या हुंकाराने मढवले. मानवी सृजनशील मनाला स्पर्श करणारी हि कथा सभागृहात प्रेक्षकांची दाद मिळवते.


यात गणेश जेस्वाल यांनी साकारलेली जुम्मन ची भूमिका, अदिती केंद्रे यांनी साकारलेली शिरयी आणि अविनाश रामगिरवार यांनी साकारलेला मुकादम लक्षवेधी ठरला तर नारबा –रमेश पतंगे, तानी- प्रांजली गुडमलवार, हरकाम्या-अखिलेश पांचाळ, मामू-रवी सोनवणे, सुक्या- प्रबोधन कवठेकर,भुत्या- गुलाब पावडे, शिरप्या- अनिल देशपांडे, परभ्या- ओमजय पुयड, राधा- संस्कृती पावडे, नाम्या स्वराज पावडे यांनी आप आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.  डॉ. मनीष देशपांडे यांनी साकारलेलं वास्तववादी नेपथ्य नाटकाची उंची वाढवण्यास यशस्वी झाले. प्रबोधन कवठेकर यांनी प्रकाशयोजना, रुद्र शर्मा यांनी संगीत, वेशभूषा आणि रंगभूषा – सुचिता देशपांडे आणि क्षमा करंजकर यांनी साकारले. एकंदर नांदेड केंद्रावरील स्पर्धा जल्लोषात संपन्न झाली. स्पर्धा यशस्वीतेसाठी समन्वयक दिनेश कवडे, स्वाती देशपांडे, सुधांशू शामलेट्टी, स्नेहा बिराजदार, किरण टाकळे, चक्रधर खानसोळे, राम चव्हाण, श्याम डुकरे, सुमित टिपरसे यांनी काम पाहिले.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी