नांदेड| वैद्यकीय पुर्व परीक्षा अर्थात नीट परीक्षेत ७२० पैकी ६८५ गुण घेणारा गौरव मारोती शिंदे याघा दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जि प सदस्य मनोहर शिंदे, सरपंच पिंटू पाटील शिंदे, साहेबराव जाधव, तातेराव ढवळे, लिपीक बळी भालके, शेख मुख्तार, संतोष शिंदे, बत्तास खोसे, ओम कवाळे, दिगंबर शिंदे, दत्ता शिंदे, डॉ. अरुण निंबाळकर, राम शिंदे, गणेशराव शिंदे, बालाजी सुगावकर, रावसाहेब शिंदे, साईनाथ कवाळे, पोलीस पाटील संजय यन्नावार समवेत धनेगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुर्वी गौरव ने नवोदय विद्यालय परीक्षेत नांदेड जिल्ह्यातुन पहिला येण्याचा बहुमानही पटकावला आहे. धनेगाव नगरीसाठी ही आभिमानाची बाब असल्याचे यावेळी सत्कार करताना जि प सदस्य मनोहर शिंदे यांनी सांगितले. ओम कवाळे यांनी संचालन तर दिगंबर शिंदे यांनी आभार मानले.