दिव्यांग विद्यार्थ्यांचे कर्तुत्व सामान्य विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -NNL


नांदेड।
शैक्षणिक असो की क्रीडा, दिव्यांग विद्यार्थी यांचे कर्तुत्व सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत मोहत्सव, समता पर्व व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने बुधवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता वजिराबाद पोलीस परेड ग्राउंड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हा स्तरीय क्रीडा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी उद्घाटकीय भाषणात जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव दलजित कौर जज, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, जि.प. चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, कार्यालयीन अधीक्षक अशोक पंडित, लेखाधिकारी सय्यद मिनाज, वैसाका संजय गोडगोडवार, निरीक्षक कैलास मोरे, महेश दवणे, मुख्याध्यापक नितीन निर्मल, यादव साळुंके आदींची उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलताना जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर म्हणाल्या की दिव्यांग विद्यार्थ्याचे पथसंचलन, त्यांची उर्जा व कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. दिव्यांग विद्यार्थ्याचे शिस्त, लय, ताल, सूर प्रशंसनीय होते. दिव्यांग विद्यार्थ्यांचे, त्यांच्या शिक्षकांची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे म्हणत दिव्यांग विद्यार्थ्याच्या कर्तुत्वावार कौतुकाची थाप मारली.

याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव दलजित कौर जज यांनीही दिव्यांग विद्यार्थीही सामान्य विद्यार्थ्यासारखी कामगिरी करू शकतो त्यांच्यातील लपलेल्या सुप्तगुणांना वाव देण्याची गरज असते. दिव्यांगही इतरांसारखाच विकासाचा प्रमुख घटक आहे. दिव्यांगांना लागणाऱ्या कायदेशीर मदतीसह अन्य मदतीसाठी आपण तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात जि. प. चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र वीरेंद्र आऊलवार यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचा आढावा घेतला. विशेष शिक्षकांच्या परिश्रमातून भविष्यात हे विद्यार्थीही जिल्हाच नव्हेच तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर यशवी ठरतील असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी क्रीडाज्योत प्रज्वलित करत क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या सोहळ्याचे सूत्रसंचलन मुरलीधर गोडबोले यांनी केले. यावेळी जिल्हाभरातील शाळेतील खेळाडू व त्यांच्या समवेत आलेल्या  शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी