हिमायतनगर। आज दि.१जुलै२०२३ रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील, महाविद्यालय हिमायतनगर येथे हरित क्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. वसंतरावजी नाईक यांची जयंती सांस्कृतिक विभागातर्फे थाटामाटात साजरी करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. उज्वला सदावर्ते होत्या तर प्रमुख उपस्थिती डॉ.डी.के.कदम(स्टाफ सेक्रेटरी),डॉ. वसंत कदम(इतिहास वि.प्रमुख), डॉ.डी.के मगर(अर्थशास्त्र वि.प्रमुख),डॉ. शाम इंगळे (वनस्पतीशास्त्र वि.प्रमुख),डॉ. गजानन दगडे (नॅक समन्वयक)यांची होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉक्टर उज्वला सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक श्री. वसंतरावजी नाईक यांच्या कार्याची आठवण, त्यांचा संघर्ष, शेतकऱ्यांविषयीची तळमळ,शेतीसाठी केलेले कार्य,जनसामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजना सांगून, त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले.
डॉक्टर डि.के कदम यांनी श्री. वसंतरावजी नाईक यांनी केलेले कृषी कार्य सांगून,शिक्षणाचा व कृषीचा अनोखा संबंध जोडून, कृषी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण प्रदान केल्याचे सांगून आपला कृषी प्रदान देश आर्थिक दृष्ट्या कसा संपन्न, समृद्ध केला ते सांगून, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेतीकडे वळायला प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सविता बोंढारे यांनी केले तर आभार सांस्कृतिक वि. सहाय्यक प्रा. आशिष दिवडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.