वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे तसेच प्रदूषण दूर करून पर्यावरणाचे जतन करणे गरजेचे -NNL


नांदेड।
वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे तसेच प्रदूषण दूर करून पर्यावरणाचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड-वाघाळा महापालिकेचे उपायुक्त निलेश सुंकेवार यांनी केले. 

नांदेड येथील परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटी विकास नगर तरोडा बु येथे आज शनिवार दिनांक 1 जुलै रोजघ कृषी दिन व डॉक्टर डे तसेच सोसायटचेचेअरमन व नवोदया क्रिटिकल केअर नांदेडचे डॉ. श्याम दवणे  यांच्या कन्या समीक्षा हीच्या वाढिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पोलीस निरीक्षक बोलमवाड, पोलीस निरीक्षक अशोक उजगिरे, महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त रावण सोनसळे, उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरतुल्ला बेग, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, लोकमत सखी मंचच्या सपना भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती वाठोरे, हृदयरोग तज्ञ डॉ. पटेल, बालरोग तज्ञ डॉ. राजेश नुणे, किडनी रोग तज्ञ डॉ. राजीव राठोड, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. वीरेंद्र अवधिया, आधारचे डॉ. तानाजी पातरपळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येपुरवार, डॉ. देवकते, डॉ. जायभाये, डॉ. शाम दवणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे आदींची उपस्थिती होती.


प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचा गुलाबाची रोपटे देवून सत्कार करण्यात आला. समीक्षा दवणेच्या उपस्थीतांच्या हस्ते पुष्पहार घालून वाढदिवस साजरा  करण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन परमेश्वर दिपके यांनी तर उपस्थितांचे आभार गंगाधर सोनाळे यांनी मानले. यावेळी पांडुरंग तारू, मनोहर भास्करे, सोपान गायकवाड, मीनाक्षी कावळे, शामराव हटकर, अशोक कावळे यांच्यासह विकास नगर सोसायटीचे सदस्य व परिसरातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी