१ अक्टोबर रोजी बेमुद्दत उपोषनाचा इशारा
धर्माबाद। शहरातील प्रभाग क्र 05 मध्ये विविध विकासकामे करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला सदरील कामे हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
परंतु सी.सी रस्त्याचे काम व सी.सी नाली अतिशय निकृष्ट दर्जाचे करत आहे हे गुत्तेदार यांनी जाणीवपूर्वक त्या कामात रस्त्याच्या मजबूती साठी लागणारे साहित्य गजाळी, गिट्टी, रेती हे अतिशय कमी प्रमाणात वापरून श्रीखंड खाण्याचे काम केले आहे. परतीच्या पावसामुळे रोड हा अक्षरशः उखडून गेला आहे.
त्यामुळे या रस्त्याचे तात्काळ काम बंद करण्यात यावे व निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदाराचे थकीत बिल थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय अदा करू नये व सर्व कामे हे इस्टमेट द्वारे करण्यात यावे व सदरील प्रकरणात जर गुतेदार दोषी आढळून आल्यास त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अश्या मागण्याचे पत्र उपअभियंता यांना देण्यात आहे.
जर या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या 1 ऑक्टोबर रोजी समस्त शिवाजी नगर रहिवास्यांकडून बेमुदत उपोषण करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली. मागणी करताना समाजसेवक शंकर सुरकूटवार, म.मुबशिर मुखीम भाई,टिपू सुलतान ब्रिगेडचे नविद अहेमद ,युवा नेते प्रवीण हनमोड आदी उपस्थित होते.