नांदेड| ख्यातनाम संगीतकार कै.नंदू होनप यांचे पुत्र स्वरुप यांनीही संगीत,गायन क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.शहरातील कलामंदिर भागातील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंती निमित्त बुधवारी, ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गायक स्वरुप होनप यांच्या संगीत दिग्दर्शनात भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी गायिका तन्वी गोरे, कोरस साथ श्वेता सदानंद नायक, ताल वाद्यावर साथि वैभव वसंत, निवेदन व तबला साथ शंतून किंजवडेकर देणार आहेत.स्वरुप होनप यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका,गीते संगीतबध्द केली आहेत.अनेक जिंगल्सही त्यांनी संगीतबध्द केल्या आहेत. अनेक ज्येष्ठ गायकांसोबत त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. विविध वाहिन्यांवरही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.
अनेक मालिका, चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. शहरातील कलामंदिर भागातील श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्रच्या वतीने सध्या श्री दत्त जयंती निमित्त कार्यक्रम सुरु आहेत. या कार्यक्रमांची सांगता ७ रोजी होणार आहे. यात स्वरुप नंदू होनप यांच्या संगीत दिग्दर्शनात श्री गुरु दत्ताची पालची कार्यक्रम ते सादर कणार आहेत.