सार्वजनिक बोअरचे मोटरपंप चालू करताना शॉक लागल्याने गौतमचंद पिंचा यांचा मृत्यू -NNL

नगरपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बोअरवरील सुरक्षाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप


हिमायतनगर ।
नगरपंचायतीच्या प्रशासनाचे शहरातील सार्वजनिक बोर वरील मोटारी आणि त्याच्या सुरक्षाकडे आक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वारंवार सुचना देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका नागरिकाचा बोअरची मोटर चालू करताना शॉक लागून मृत्यू झाला आहे, गौतमजी शांतीलाल पिंचा असे मयत व्यक्तीचे नाव आहे, या घटनेला नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे आरोप नागरिकांतून केले जाते आहेत.

हिमायतनगर येथील नगरपंचायत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते आता सार्वजनिक बोरची मोटर चालू करताना एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा नगरपंचायत चर्चेत आली आहे. मागील दोन वर्षांपासून  हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुका राखडलेलेच आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी शहरातील नागरिकांना हव्या त्या सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहेत. बहुतांश अधिकारी कर्मचारी स्थानिक ठिकाणी न राहता नांदेड व आपल्या सोयीच्या ठिकाणी राहून येजा करत असल्यामुळे हिमायतनगर शहरातील नागरिकांना नागरी समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.

शहरातील रस्ते, नाल्या, सार्वजनिक खांबावरील वीज, सार्वजनिक बोअरवरील विद्युत मोटारी व स्टार्टरच्या नादुरुस्तीच्या समस्या नेहमीच्या झाल्या आहेत. यासह बहुतांश भागात सार्वजनिक नळाला पाणीदेखील येत नसल्यामुळे नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो आहे. मागील पंचवार्षिक काळात हिमायतनगर शहरात विकास कामाच्या नावाखाली 50 कोटी गुण अधिक खर्च रस्ते येणाऱ्या पाणी यासह विविध कामासाठी झाला परंतु शहरातील समस्या आजही जैसे देत आहेत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने रस्ते न्यायालयाच्या विकास कामाची पोल खोली असून शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे आगामी काळात गणेशोत्सव असल्याने मिरवणुकी या खड्ड्यामध्ये असल्यामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे असे असताना देखील या समस्याकडे नगरपंचायत प्रशासन  लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शहरातील नागरिक नागरि सुविधा पासून वंचित आहेत.

अशा समस्या तर सार्वजनिक भरभर वारंवार निर्माण होत आहेत मात्र बोर वरील मोटार पंप चालू करण्याचे ठिकाणची सुरक्षितता नसल्याने नागरिकांच्या जीवावर भेटत आहे. असाच प्रसंग काल दिनांक 21 रोजी वार्ड क्रमांक 9 मधील एका बोरवर घडला. या ठिकाणी सार्वजनिक बोरची मोटर चालू करण्यासाठी दिलेले गौतम शांतीलाल श्री श्रीनाथ यांना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा यामुळं एक नागरीक जीवानिशी गेला आहे. प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेने या प्रकाराकडे लक्ष देऊन सार्वजनिक मोटरपपं चालू करण्याच्या स्टार्टर किटच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलुन पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

1 Comments

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी