नांदेड| कारागृह नाही तर जीवन सुधारगृह आहे. कारागृहात तुम्ही जीवनात सुधारणा होण्यासाठी आहात शिक्षा भोगण्यासाठी नाही. कारागृहला संस्कार परिवर्तनाचा केंद्र बनवा. यामध्ये एक दुसऱ्याचा बदला घेण्यासाठी नाही तर स्वतः मध्ये बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे उद्गार माउंट आबू राजस्थान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय (मधुबन) येथून आलेले ब्रह्मकुमार भगवान भाई यांनी सांगितले. ते नांदेड जिल्हा कारागृहात (जेल) बंदिस्त असलेल्या कैदी ना कर्माची गति आणि व्यवहार शुद्धि या विषयावर बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले कि, कारागृहात एकांतांत बसून स्वतः मध्ये बदल घडून आणण्यासाठी विचार करा कि मी या संसारात का आलो आहे? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? मला ईश्वराने कोणत्या उद्देशाने या सृष्टीमध्ये पाठविले आहे? मी येथे काय करीत आहे? अशा बाबतीत विचार करून चांगले विचार आत्मसात केल्याने संस्कार, व्यवहार मध्ये बदल घडून येतो. कारागृह तुमच्या जीवनात सुधार आणण्याची तपोभूमी आहे असे सांगितले.
आपण शांती चे सागर, दयालू, कृपालू, क्षमाचे सागर परमपिता परमआत्मा चे लेकरे आहोत. आपण स्वतः ला विसरल्यामुळे आपण चुका करीत असतो. आपण असे कोणतेही कर्म केले नाही पाहिजे कि त्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागेल व आपल्या पित्याचे नाव बदनाम होईल. स्वतः मध्ये असलेले अवगुण व वाईटपणा आपल्यातून नष्ट करणे आवश्यक आहे. ईर्ष्या, द्वेष, चोरी, लोभ, मोह, हे आपले दुश्मन आहेत. यामध्ये अधीन झाल्याने आपल्या मान, सम्मान यास ठेस पोहंचते. जीवनात नैतिक मूल्य ची धारणा करण्याची आवश्यकता आहे. जीवनात सद्गुण नसल्यामुळे समस्या, विघ्न यांचा जन्म होतो असे भगवान भाई यांनी सांगितले.
यावेळी मनुष्य जीवन अनमोल आहे जीवनात वाईट कर्म करून जीवन व्यर्थ घालू नये. समस्या, विघ्न यास परीक्षा समजून हिंमत, संयम व सहनशक्ती ने यावर विजय मिळविणे आवश्यक आहे. जीवनात परिवर्तन आणून श्रेष्ठ चरित्रवान बनणे आवश्यक आहे, असे झाले तर कारागृह नाही तर जीवन सुधारगृह आहे हे सिद्ध होईल.
यावेळी भगवान भाई यांनी सांगितले कि, जो जसे कर्म करेल तसे तो फळ चाखेल. आपल्या मनात पहिले विचार येतात कृती नंतर होत असते. विचारानेच इतराबद्दल प्रेम, द्वेष, या भावना निर्माण होत असतात. जर आपणास इतराबद्दल चांगले विचार केले तर इतरांमध्ये देखील आपल्याप्रती चांगले विचार निर्माण होतील. जो दुसर्यांना दुःख देतो त्याला दुसर्याकडून सुख मिळणार नाही तर दुःखचं मिळेल. जो दुसर्यांना सुख देईल त्यास दुसर्याकडून सुखच मिळेल हा कर्माचा व विचाराचा सिद्धांत आहे. चूक करणार्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो. आपण सर्वजण ईश्वराची लेकरे आत्मा आहोत. जीवन हे अनमोल आहे याचा उपयोग श्रेष्ठ कर्म करण्यासाठी झाला पाहिजे. आपण जीवनाच्या अंतिम स्वाश असेपर्यंत सदैव श्रेष्ठ कर्म केले पाहिजे असे यावेळी भगवान भाई यांनी सांगितले.
यावेळी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र कैलाशनगरच्या बी के आर्चना बहन जी ने सांगितले कि जर ईश्वराला सर्व संबंधाने आठवण केली तर त्यांची शक्ती व गुण आपल्यात येतात व आपण कितीही अडचणीत असलो तरी त्यावर मार्ग निघतो व आपण सुखात, आनंदांत, समाधानात राहू शकतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले. यावेळी कारागृह अधीक्षक सुभाष सोनावने यांनी सांगितले कि जो जसा विचार करेल तसे तो बनतो. यासाठी आपण सदैव चांगले विचार केले पाहिजे असे सांगितले व ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र कैलाशनगर व भगवान भाई याना विशेष असा कार्यक्रम घेतल्याबद्दल धन्यवाद दिले. भविष्यात असे अनेक कार्यक्रम घेण्यासाठी येत राहावे असे आमंत्रण दिले.
यावेळी कारागृह उपअधीक्षक रविन्द्र रावे म्हणाले कि भगवान भाई यांनी सांगितलेले विचार जर आत्मसात केले तर आपल्यातून वाईट विचार नष्ट होतील व आपण एक चांगले व्यक्ती बनून स्वतःची व देशाची सेवा करण्याची पात्रता आपल्यात येईल. कार्यक्रमाच्या शेवटी तणावापासून दूर राहावे व मनोबल वाढविणे यासाठी राजयोग मेडिटेशन राजयोगी भगवान भाई यांच्याद्वारे घेण्यात आले.
यावेळी सेवाकेंद्र कैलाशनगर चे में बी के नागनाथ भाई यांनी भगवान भाई यांचा परिचय सर्वाना सांगितला व कार्यक्रम घेण्याची संधी दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक मा.सुभाष सोनवणे, उप अधीक्षक मा. रवींद्र रावे यांचे आभार मानले. यावेळी सेवाकेंद्र कैलाशनगरचे बी के माधव भाई यांची प्रामुख्याने उपस्तीथी होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजयोगी भगवान भाई यांचा कारागृह अधीक्षक व उप अधीक्षक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृहाची टीम यांनी मोलाची भूमिका बजावली.