पुरस्थितीची पाहणी करताना हिमायतनगरचे तहसीलदार गायकवाड याना हृदयविकाराचा झटका -NNL


हिमायतनगर|
तालुक्यात मागील ११ दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले हिमायतनगरचे तहसीलदार डी.एन.गायकवाड याना हृदय विकारांचा झटका आल्याने तातडीने त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. हि घटना दि.१३ जुलै रोजी दुपारी घडली असून, सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

विदर्भ -  मराठवाडयाच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी आणि तालुक्यातील नाले, तलाव ओव्हरफ्लोव झाल्याने तालुक्यातील अनेक गावचा संपर्क तुटला होता. तर अनेक ठिकाणी घोरपडी आणि शेतीपिके पूर्णतः पाण्याखाली गेली. याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार डी.एन.गायकवाड यांनी हिमायतनगर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपल्या सहकार्यांसह हिमायतनगर तालुक्यात दी.१३ जुलै रोजीदाखल झाले. तालुक्यातील विविध गाव परिसर आणि नाल्याच्या पुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानींची पाहणी मंगरूळ ते खैरगाव परिसरात दाखल झाले. 

या ठिकाणी 'पाहणी करीत असताना गायकवाड यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुगालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. 

तालुक्यातील शेतकऱ्यांची वाताहत होऊ नये आणि पुरस्थितीचा अहवाल मंत्रिमंडळ स्तरावर पाठविण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी तात्काळ हिमायतनगर येथील तहसीलचा पदभार श्री अवधाने यांच्येकडे दिला आहे. आणि त्यांनी दि.१४ पासून पीक परिस्थिती, घरपडी, पुराचा फटका बसलेल्या गावागावची टप्प्याटप्प्याने पाहणी सुरु केली आहे.

2 Comments

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी