दुर्लक्षित, उपेक्षित वस्तीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे लक्ष -NNL

लगेचच मुले जमवली आणि शाळाही सुरू झाली


नांदेड|
रेल्वे स्टेशनच्या रोडवर हुतात्मा स्मारकाजवळ वर्दळीच्या डाव्या बाजूला फिरत्या लोकांची एक वस्ती आहे. या दुर्लक्षित आणि उपेक्षित वस्तीकडे लक्ष गेले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे. आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला फिरत्या मुलांसाठी हंगामी शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले. लगेचच मुले जमवली आणि शाळाही सुरू झाली.

आम्हालाही हे हवं ,आम्हाला ते हवं, पाटी पेन द्या ,आम्ही शाळेत येऊ अशा प्रकारचा आग्रह विद्यार्थी अगदी जवळ करू लागले आणि तेवढ्याच प्रेमाने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी त्यांना प्रतिसाद देऊन संवाद केला. अनेक वर्षापासून या परिसरात उत्तर प्रदेश ,बिहार इतर राज्यातून काही लोक येतात त्.यांच्यासोबत त्यांची मुलं असतात .या मुलांचे शिक्षण कुठल्या शाळेत होत नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी शिक्षण विभागाला या ठिकाणी या मुलांची सोय करण्याचे निर्देश दिले. 


आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर , उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य जयश्री आठवले, अधिव्याख्याता अभय परिहार, यशोधरा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोका शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक ,नांदेड पंचायत समितीचे विषय तज्ञ, जिल्हा परिषदेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.विलास ढवळे, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, बाल रक्षक समन्वयक डॉ.डी टी शिरसाठ, रवी ढगे, उषा नळगीरे,मारोती ढगे,विकास ढवळे यांचा चमू या ठिकाणावर पोहोचला प्रांगण पाहून साफसफाई झाली मुलांना बोलावले. 

अनौपचारिक पद्धतीने मुलं गाणी म्हणून लागली. तबला वाजू लागली आणि कविता म्हणू लागली.  यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वही पेन पुस्तक आणि शाल वितरित करण्यात आली. या ठिकाणी सर्व राहणाऱ्या लोकांची आरोग्य तपासणी आणि इतर सुविधा निर्माण करून देण्याचे वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले. याठिकाणी 25 मुले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी