नायगांव, रामप्रसाद चन्नावार। नांदेडच्या प्रविण बियाणी यांच्या निर्मिती व संकल्पनेतुन साकारलेला 'गैरी' हा चित्रपट उभ्या महाराष्ट्रातल्या रूपेरी पडद्यावर १६ डिसेंबर रोजी झळकणार असुन या निमित्ताने पुन्हा एकदा नांदेडच्या मातीचा सृजनशिल दरवळ संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.
प्रविण बालाप्रसादजी बियाणी हे नाव नांदेडकरांना विविध अंगानी परिचीत असं नाव. याच प्रविण बियाणी यांनी आदिवासी समाजाचं जगणं , वैद्यकिय सुविधांचा अभाव आणि एकुणच या क्षेत्रातील प्रवृत्तीचा गैरी या चित्रपटातून वेध घेतला आहे. नायगांव तालुक्यातला कृष्णर इथल्या पांडुरंग जाधव यांनी या चित्रपटाच लेखन - दिग्दर्शन केलं आहे. मयुरेश पेम, आनंद इंगळे, नम्रता गायकवाड, देविका दफ्तकार, केतन पवार, सुनील देव, प्रणव, समीर खांडेकर आदी प्रतिभाशाली अभिनेत्यांचा अभिनय, प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर यांची गीतं आणि अमित राज यांच अफलातून संगीत ही गैरी या चित्रपटाची वैशिष्टये आहेत.
प्रदशनापुर्वीच समीक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरलेला हा गैरी एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे. केवळ मनोरंजनच नको तर सामाजिक जाणिवा प्रगल्भ झाल्या पाहिजेत असं नेमकेपणानं सांगणारा हा चित्रपट प्रविण बियाणी या युवकाचा अभिजात कलाविष्कार आहे. म्हणुनच प्रविणच्या या पहिल्याच प्रयत्नाचं नांदेडकर नक्कीच भरभरून स्वागत करतील असा विश्वास प्रविण बियाणी यांच्या मित्रमंडळाने व्यक्त केला आहे.