शेतकऱ्यांनी जनावरांना सोयाबीनच्या रानात जाऊ देऊ नये - डॉ.सोनटक्के -NNL

सोयाबीनच्या रानात चारल्याने जनावरांना पोटफुगीचे आजार वाढले 


हिमायतनगर,अनिल नाईक| शहर व परिसरात मागील काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे सोयाबीनची झाडे कुजली आहेत. त्यामुळे रानात कुजून पडलेल्या त्या झाडांना आणि सोयाबीन काढलेल्या ढिगाऱ्यावर त्याचा पडलेला कचरा खाल्ल्याने जनावरांमध्ये पोटफुगीचे आजार वाढले आहेत. हिमायतनगर तालुक्यात आत्तापर्यंत ९ केसेस दाखल झाल्या असून, या आजारापासून जनावरांना  वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना सोयाबीनच्या रानात चारवण्यासाठी नेऊ नये असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ सोनटक्के यांनी केले.

आज सकाळी शहरातील डांगे नामक युवा शेतकऱ्याने आपल्या गाईला पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले होते. यावेळी डॉ.सोनटक्के यांनी गाईची तपासणी केल्यानंतर गाईचे पोट फुगल्याचे लक्षात आले. त्यांनी सादर गाईवर उपचार केला असून, वेळेवर गाईला उपचारासाठी आणल्यामुळे गाईला पुढील होणार धोका टाळला आहे. अश्या प्रकारे जनावरांचे पोट फुगल्यानंतर जनावरांची स्थिती अत्यंत नाजूक होत असून, एखाढ्यावर विषप्रयोग झाल्यावर कशी अवस्था होते तशीच तडफड या गाईला होत असल्याचे पाहावयास मिळाले आहे. तातडीने सादर गाईल नीडल द्वारे पोटात जमलेला गैस बाहेर काढून रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अँटिबायोटिक औषध देऊन उपचार केल्याने गाईचा धोका टळला. 

अश्या प्रकारच्या आजारात पशूंवर गंभीर परिणाम होऊ नयेत म्हणून गाईची प्रकृती पूर्ववत स्थिर होण्यासाठी डॉक्टरांना बाहेरील मेडिकल सोअर्सवरून १) Parallex , Liq. २) Parallex 450 ml, ३) Inj Ringers Lactate 500 ml, ४) Inj Soda Bicarbonate, ५) Antidirrhoea tablets अशी औषधी मागवावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच भुर्दंड सहन करावा लागत आहे, शासनाने जनावरांच्या पोट फुगीच्या या आजारावर आणि गंभीर झालेल्या जनावरांना उपचारासाठी लागणारी वरील सर्व औषधी हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना केली आहे.  

जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक आजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात. कारण सध्या तालुक्यात सोयाबीनची काढणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मागील काळात हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन कुजले असून, अनेक ठिकाणो कोंब फुटली आहेत. तसेच काही सोयाबीन पिकाची नासधूस होऊन आणि किडके, डागेल, बुरशीयुक्त व ओले झाल्याने ती काढताना रानात पडून आहेत. तिचं खाद्य हि जनावरे खात असल्याने पोट फुगते आहे. हेच खाद्य अन्ननलिका कोंडल्यास, जनावरांच्या आंतरपटलाच्या हर्निया, धनुर्वात, अन्ननलिकेवरील व जठरावरील सूज, जंतांचा प्रादुर्भाव व शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पोटफुगी होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी  आणि जनावरे सोयाबीनच्या रानात आणि काढलेल्या ढिगावर चारविण्यासाठी सोडू नये असे आवाहन पशुधन विभागाने केले आहे. 

अगोदरच बळीराजा अतिवृष्टीने हवालदिल झाला, शेतातली सोयाबीन पाण्याने पूर्णतः नुकसानीत आले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता जनावरांनी सोयाबीनच्या रानातील झालेल्या सोयाबीनमुळे पोटफुगीचे आजार वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसानीस आता पशु धनाच्या नुकसानीची भीती वाटू लागली आहे. त्यातच पुन्हा औषध उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अधिकच भुर्दंड सहन करावा लागत आहे, हि बाब लक्षात घेता पोटफुगीच्या पशुधनानं वाचविण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात आवश्यक असलेली औषधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी युवकांनी केली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी