कोविड-१९ काळात उत्कृष्ट कार्याबद्दल मुदखेड येथे गौरव सोहळा व आशा उत्सव थाटात साजरा -NNL


मुदखेड।
दि २५ मे २०२२ रोजी मुदखेड येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरात डॉ संतोष चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या कार्यालयातील स्टाफच्या अथक परिश्रमातून आयोजित विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये कोविड-१९ काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.तसेच अतिशय कमी मानधनावर काम करुन आरोग्य सेवा ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविणाऱ्या आशा कार्यकर्ती यांच्यासाठी " आशा उत्सव " अतिशय उत्साहात पार पडला.तसेच गेल्या तीन वर्षांपासून कोविड-१९ नियंत्रणासाठी अविरतपणे सेवा देणाऱ्या व सतत मानसिक तणावाखाली असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळा ही घेण्यात आली.

यावेळ मुदखेड पोलिस निरीक्षक महेश शर्मा, डॉ. दिलीप फुगारे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मुदखेड, गटशिक्षणाधिकारी सुधीर गोडघासे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुमेध संस्थाने, पत्रकार संजय कोलते. डॉ संजय कासराळीकर वैद्यकीय अधिकारी मुगट, डॉ अभय मोरे, वैद्यकीय अधिकारी, रोहि पिंपळगाव, डॉ सुरेश पवार वैद्यकीय अधिकारी चिकाळा, सत्यजीत टिप्रेसवार तालुका आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) तसेच तालुक्यातील आरोग्य विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीच्य प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांच्या प्रस्तावनेनंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, आशा गट प्रवर्तक, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,डाटा एन्ट्री आपरेटर, वाहन चालक, परिचर, सफाई कामगार इत्यादींचा प्रमाणपत्र देवुन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा विविध वक्त्यांच्या मार्गदर्शनामुळे सर्वांसाठी अतिशय उपयोगी ठरली.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांनी कोविड-१९ काळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल कौतुक करुन " आरोग्य मनाचे "  या विषयावर आपल्या सुंदर, प्रभावी व काव्यमय भाषेत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ब्रम्हकुमारी सेवा केंद्र, वसंत नगर, नांदेडच्या संस्था पिका,राजयोगिनी स्वाती दीदी यांनी शोध मनःशांतीचा याबाबत मार्गदर्शन करून प्रत्यक्षात मनःशांती ची अनुभूती दिली तर नांदेड येथील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ प्रणद जोशी यांनी अतिशय सोप्या भाषेत ताणतणाव व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन केले. डॉ. संतोष चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी या सर्वांचा मागोवा घेत व संत साहित्याचे दाखले देवुन संवाद साधला.

 दुपारच्या सत्रातील आशा उत्सवामध्ये आशातील कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सर्व आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविका यांनी पारंपारिक वेषभुषेत न्रृत्यावर ताल धरला व अंताक्षरी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेवटी उपस्थित आशा कार्यकर्ती यांचे  मनोगतानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार असे सुत्रसंचलन उत्तम कराड, आरोग्य सेवक यांनी तर आभारप्रदर्शन कृष्णा डाफने यांनी केले व कार्यक्रम यशस्वी संपन्न केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी