वीटभट्टीवर कामगारांच्या मुलांसाठी एक वही एक पेन उपक्रम; ज्येष्ठांसह नवोदित कवी कवयित्रींची काव्यमैफिल रंगली!
नांदेड| सद्या उष्णतेसह महागाईने कहर केला आहे. कोरोना नसला तरी महागाईचे मोठे संकट सर्वसामान्यांच्या जीवनात आले आहे. प्रत्येक वस्तूंच्या किंमती दुप्पट तिप्पट झाल्या आहेत. श्रीलंकेप्रमाणे भारतातही आर्थिक आणीबाणी येऊ शकते. कोरोना काळामुळे कष्टकरी समुहांच्या पाल्यांचे शिक्षण जवळपास थांबलेच होते. आता तरी कामगारांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये अशी अपेक्षा येथील धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. यावेळी साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, पंचफुला वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, सविता वाघमारे, नागोराव डोंगरे, लक्ष्मण कोंडावार, दत्ताहरी कदम, राजेश्वर कांबळे, परशुराम केंद्रे, संतोष घटकार, मारोती चक्रधर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात व्याख्याते तथा स्तंभलेखक शंकर गच्चे यांची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हा शाखेच्या वतीने वाजेगाव परिसरातील वीटभट्टीवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कामगारविषयक धोरण' या विषयावर व्याख्यानाचे आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञाधर ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांच्या मुलांसाठी 'एक वही एक पेन' हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पंय्याबोधी थेरो बोलत होते. अखिल भारतीय जिवा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष लक्ष्मण कोंडावार यांनी डॉ. आंबेडकरांच्या कामगारविषयक धोरणावर प्रकाश टाकला. त्यानंतर सुप्रसिद्ध कवी राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काव्य मैफिल रंगली. त्यात अतिथी कवी गणपत माखणे, अशोक कुबडे यांच्यासह हनुमंत चंदनकर, चंद्रकांत कदम, गौतम कांबळे, माया खिल्लारे, दिगांबर कानोले, मारोती कदम, शेख जाफरसाब, चंद्रकांत चव्हाण, रुपाली वागरे वैद्य, पूजा ढवळे, वंदना खिल्लारे, थोरात बंधू, जितेंद्र लोणे, विशालराज नांदेडकर, भैय्यासाहेब गोडबोले, सुनील नरवाडे, संदीप काळे, नागोराव डोंगरे, रणजीत गोणारकर, आनंद गोडबोले आदींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सप्तरंगी साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष नागोराव डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन रणजीत गोणारकर यांनी तर आभार अनुरत्न वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया गायकवाड, अनुसया कांबळे, चांगुणा एडके, आशा एडके, माया एडके, सोनी गोविंद, शितल गोविंद, रोशनी गायकवाड, आकांक्षा गायकवाड राहुल गायकवाड, गोविंद कांबळे, निवृत्ती एडके, सुरेश एडके, रविकिरण एडके, गणेश एडके, माधव मेकाले, कुणाल भुजबळ, माधव शिंदे, सिध्दार्थ गजभारे, शै. सलीम, निखिल जोंधळे, हनिफ शेठ, किसन तारु, निखिल दामोदर, सतिश ढवळे, देवा गायकवाड, डोमपल्ले, हैबती शिंदे, विठ्ठल शिंदे, छायाबाई मेकाले, सुषमा शिंदे, पुजा शिंदे, शोभाताई एडके, नागेश मेकाले, अरविंद जुळवेकर, लता अरविंद जुळवेकर यांनी परिश्रम घेतले.