नायगाव, दिगंबर मुदखेडे| उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनात हिंसाचार घडवून शेतकऱ्यांचा चिरडून खून करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आज दिनांक 11/ 10/ 2021 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यावेळी नायगाव येथे काँग्रेसच्या वतीने शहरातून फेरी काढून सरकारच्या विरोधात घोषणा देत उत्तर प्रदेश योगी सरकारचा निषेध करण्यात आला. या बंडाला तालुक्यातील संमिश्र प्रतिसाद मिळाला.
लखिंपुर येथील घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून त्या घटनेचा सर्वच स्तरावर निषेध व्यक्त करण्यात येत होता आणि त्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने आज सोमवार या शहरातील तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून बंदला चांगला प्रतिसाद दिला.
तर काँग्रेसच्या वतीने नायगाव शहरात यावेळी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व फेरी काढण्यात आली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या निषेधार्थ श्रीनिवास पाटील चव्हाण , रवींद्र पाटील चव्हाण बालाजी चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बाचावार यांनी बंदोबस्त ठेवला होता.