नांदेड| नायगाव तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक बस तर सचिवपदी प्रकाश बैलकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नायगाव शाखेची बैठक कामगार नेते कॉ.प्रदीप नागापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत खालील प्रमाणे कार्यकारणी एकमताने निवड केली आहे अध्यक्ष अशोक गंगाधर बैस, उपाध्यक्ष संताजी पांढरे, सचिव प्रकाश बैलकवाड, सर्कल प्रमुख (कुंटूर) यादव हनवटे, हनुमंत परडे, (बरबडा) वाघमारे मनोरकर, प्रकाश गारोळे, (नरसी) काशिनाथ शिपाळे, सचितानंद पवार, (मांजरम) चंद्रकांत शिंदे, संतोष ईबितदार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्राम पंचायत निवडणुकत निवडून आल्याबद्दल ग्राम रोजगार सेवक प्रकाश गारोळे, संताजी पांढरे, साहेबराव गोपुलवाड, रामोटकर यांचा सत्कार करण्यात आला.