हिमायतनगर| वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल ता. देगलूर जि. नांदेड येथील कृषीदूत श्रीरामे विशाल उत्तमराव याने ग्रामीण कृषी कार्यनुभव कार्यक्रम ( RAWE ) व कृषी आधारित उद्योग उपक्रम (AIA) २०२१-२०२२ अंतर्गत सिरंजनी ता. हिमायतनगर जि. नांदेड गावातील इंद्रप्रसाद विद्यासागर पोपलवार यांच्या शेतात शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिका द्वारे मार्गदर्शन केले.
त्यामधे एकात्मिक शेती विषयी जागरूकता निर्माण करणे, बियांचा वर्गीकरणाबद्दल माहिती दिली, शेतीचा संबंधित वेगवेगळे अँप्स बद्दल माहिती दिली त्यामधे ( PLANTIX, AGROSTAR, AGROMART ETC) इत्यादी, माती परिक्षणाचे महत्व समजावुन सांगितले .जनावरांचे व्यवस्थापन कसे करावे या बद्दल माहिती दिली. दुग्ध व्यवसाय, जलसंवर्धन, कीड व रोग नियंत्रण भाजीपाला सुरक्षित व ताजे ठेवण्यासाठी ( ZERO ENERGY COOL CHAMBER ) कसे बनवावे हे प्रात्यक्षिक द्वारे बनवुन व समजावुन सांगितले. तसेच कृषी दूतकडून इ - पीक पाहणी बद्दल बरेचश्या शेतकऱ्यांना अचुक माहिती पुरवली.
अश्या सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम होता. त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुळे . आर .एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. भरडे एस. एस. कार्यक्रम समन्वयक डॉ. अवताडे एस. सी. सरांचे मोलाचे मार्गदर्शन कृषीदुताला लाभले. प्रात्यक्षिक सादरीकरणाच्या वेळी गावातील सर्व जेष्ट मंडळी उपस्तीत होते. तसेच त्याचे मोलाचे सहकार्य कृषीदूताला लाभले.