NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

बुधवार, 30 अक्तूबर 2013

मदरशांना अनुदान

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून मदरशांना अनुदान

नांदेड(अनिल मादसवार)ज्या मदरशांमध्ये फक्त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्यात येत आहे आणि ज्यांना आधुनिक शिक्षणाकरिता शासकीय अनुदान घेण्याची इच्छा आहे अशा मदरशांकडून अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन अर्ज मागवित आहे. सदर मदरसे धर्मेदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. अशा मदरशानी शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2013 च्या तरतुदीनुसार पुढील बाबींकरिता विहित नमुन्यात अर्ज करावेत. विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्या -करिता शिक्षकांना मानधन देणे, पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान आणि मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. ...........

विकासासाठी निधी द्यावा

नांदेडच्या विकासासाठी 221कोटी रुपयांचा निधी द्यावा, महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतंर्गत सुरु असलेल्या आणि प्रलंबित विकासकामासाठी 221 कोटी रुपयांचा निधी द्यावा, केंद्र सरकारकडून नव्या प्रकल्पासाठी दिलेल्या निधीचा 10.65 कोटीचा पहिला हप्ता वर्ग करावा तसेच नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 55.87 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मान्यता देण्याची आग्रही मागणी महापौर अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंगळवारी (दि.29) प्रत्यक्ष भेटीत केली आहे. संबधित अधिका-यांशी चर्चा करुन नांदेडला जास्तीत जास्त निधी देण्यासह महापौरांनी केलेल्या अन्य मागण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ........

मौलाना गुलाम वस्तानवि

सर्व धर्माचा सन्मान करण्याची शीकवण देतो इस्लाम धर्म .. मौलाना गुलाम वस्तानवि


हिमायतनगर(अनिल मादसवार)भारत आमचा देश आहे.. आम्ही या देशाचे रहिवाशी असल्याचा गर्व आहे. इस्लाम धर्माची शिकवण हि सर्व धर्माचा सन्मान करण्याचे शिकवितो. सर्व समज बांधवांची एकजुटता देशाच्या विकासात भर पाडते. करिता सर्व समाज बांधवांनी आपले विचार बदलून दुसर्यांप्रती प्रेम भावना वृधिंगत करून एकतेचा संदेश द्यावा. असे आव्हान दारूल उलुम देवबंदचे माजी अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवि यांनी व्यक्त केले. ............

मंगलवार, 29 अक्तूबर 2013

चीनची कार्य संस्कृती अंगीकारण्याची गरज


काम करण्याची अत्याधुनिक मानसिकता रूजावी-मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

नांदेड(सुरेश कुळकर्णी)आधुनिक सुख सोयी सोबत काम करण्याची आधुनिक मानसिकता महाराष्ट्रात निर्माण झाली तर राज्याचा आदर्श देशात घेतला जाईल,त्यासाठी चीनची कार्य संस्कृती आपण अंगीकारण्याची गरज आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ........

बाभळी

लेंडी प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची - मुख्यमंत्र्यांची ग्वाही


नांदेड(अनिल मादसवार)लेंडी आंतरराज्य सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी विशेष तरतूद उपलब्ध करुन देण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथे दिली. 
...........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4540&cat=Mainnews

सोमवार, 28 अक्तूबर 2013

गाईला वाचविले

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने
गाईला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले

नांदेड(अनिल मादसवार)पाठीमागे लागलेल्या घोड्यापासून जीव वाचवण्यासाठी धावत सुटलेली गाय दोन घरांच्या भिंतीत अडकून पडली.... पुढे जाता येईना आणि मागे सरकताही येईना....मृत्युच्या दाढेत सापडलेल्या या गाईला महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने भिंत फ़ोडून सुखरुपपणे बाहेर काढले. सोमवारी (दि.28) सकाळी 9 च्या दरम्यान लोहार गल्लीत ही घटना घडली. ..........

रविवार, 27 अक्तूबर 2013

निक्रष्ठ

पोटा बु.अंतर्गत ३ लाखाच्या रस्त्याचे काम निक्रष्ठ 

हिमायतनगर(वार्ताहर)राजकीय वरद हस्त असलेल्या येथील एका गुत्तेदाराने दलित वस्तीच्या निधीतील काम निक्रष्ठ पद्धतीने केल्यामुळे अवघ्या ४ महिन्यातच रस्त्याची वाट लागली ठीक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे निक्रष्ठ कामाची पोल खुलली आहे. या कामाची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही ...........

रेल्वे सेवांचा शुभारंभ

मुंबई ते अजनी, निजामाबाद आणि कारैक्काल
या तीन नवीन साप्ताहिक रेल्वे सेवांचा शुभारंभ

मुंबई(प्रतिनिधी)लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते अजनी (नागपूर), निजामाबाद आणि कारैक्काल या तीन नवीन साप्ताहिक रेल्वे सेवा सुरु करण्यात आल्या असून रेल्वे संदर्भातील महाराष्ट्राच्या मागण्यांवर टप्प्याटप्याने सकारात्मक निर्णय घेण्यात यईल, अशी माहिती केंद्रिय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी आज येथे दिली. ..

विकासाचा आराखडा

हदगाव शहराच्या सर्वांगिन विकासाचा नगरपरिषदेने आराखडा तयार करावा पालकमंत्री डी. पी. सावंत

नांदेड(अनिल मादसवार)हदगाव शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजूर झाला असून विकास कामांच्या प्राधान्यक्रमानुसार हदगाव शहराच्या सर्वागिन विकासाचा आराखडा नगरपरिषदेने तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली.हदगाव शहराच्या विकास कामांचा आढावा पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी घेतला. यावेळी ते बोलत होते. हदगावचे आ. माधवराव पाटील जवळगावकर आणि हदगाव नगरपरिषदेचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांची तसेच आ. वसंत चव्हाण, निवासी उपजि........

गुत्तेदार मालामाल

कामारी गटातील रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची..
अभियंत्याच्या आशीर्वादाने गुत्तेदार मालामाल

हिमायतनगर(प्रतिनिधी)कामारी गटातील जी.प.सदस्य अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याची कामे अत्यानात निकृष्ठ दर्जाची झाली असून, तर काही ठिकाणची कामे न करता, पूर्वीचीच कामे दाखवून बिले काढण्याच्या प्रकार सुरु आहे. या प्रकाराला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता यांचे अभय मिळत असल्याने शासनाचा निधी थेट गुत्तेदाराच्या घश्यात उतरत असल्याने गुत्तेदाराबरोबर शासनाची पगार उचलणारे अभियंते मालमाल होत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून पुढे येत आहेत. .........

शनिवार, 26 अक्तूबर 2013

शिक्षकांची शाळांना दांडी

हिमायतनगर तालुक्यात शिक्षणाच्या आयचा घो...
दिवाळीच्या सुट्ट्यापूर्वीच शिक्षकांची शाळांना दांडी

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील गटशिक्षण अधिकाऱ्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे तालुक्यातील जी.प.शाळेतील शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्ट्यापूर्वीच शाळेला दांडी मारण्याचा प्रकार सुरु केल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली आहे. या प्रकारामुळे तालुक्यात शिक्षणाच्या आयचा घो... होत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. या प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण सभापती , मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षण प्रेमी नागरिक व पालकातून व्यक्त होत आहे. ...........

शुक्रवार, 25 अक्तूबर 2013

दत्तमांजरी गावतलाव भूमिपूजन

विकास कामासाठी सर्वांनी एकत्र आल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल - अशोकराव चव्हाण


नांदेड(अनिल मादसवार)विकासाच्या कामासाठी सर्वांनी एकत्र कार्य केले पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.श्रीक्षेत्र माहूर नजिक दत्तमांजरी गावतलाव बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी प्रमुख अतिथी उद्धाटक म्हणून माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डी. पी. सावंत हे होते तर खासदार सुभाषराव वानखेडे, आ. विजयराव खडसे, पंचायत समिती सभापती सौ. अनुसयाबाई राजूरकर आदीची प्रमुख उपस्थिती होती. .........http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4475&cat=Latestnews

पावसामुळे नुकसान.

पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारीचे नुकसान...बळीराजा चिंतेत हिमायतनगर(प्रतिनिधी)तीन दिवसापासून परिसरात आभाळात ढगांची गर्दी, उन - सावलीचा खेळ सुरु असताना अधून मधून पावसाचे जोरदार आगमन होत आहे. या पावसामुळे शेतात उगवलेले पांढरे सोने (कापूस), ज्वारी, तूर, सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी खरीपात पेरलेल्या पिकांचे उत्त्पन्न ९० टक्के घटल्याने लावलेला खर्च निघणे अवघड बनले आहे. निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे ऐन दिवाळीत बळीराजा पुरता अडचणीत आला आहे. ..............
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4462&cat=Shetshivar

हॉकी

हॉकी खेळाच्या प्रसारासाठी शासनाचे विशेष लक्ष - पालकमंत्री डी. पी. सावंत

नांदेड(अनिल मादसवार)हॉकी खेळाच्या प्रसारासाठी शासन विशेष लक्ष देत असून खेळाडुंनी हॉकी खेळावर मन लावून लक्ष दिले तर हॉकीमध्ये पुन्हा भारत नंबर एकवर येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नांदेड जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्यावतीने .........

गुरुवार, 24 अक्तूबर 2013

वृत्ताची दाखल

वृत्त प्रकाशित होताच विस्तार अधिकाऱ्यांची भेट ...वंचित युवक न्यायाच्या प्रतीक्षेत

नांदेड(प्रतिनिधी)दारिद्र्य रेषेतील यादीतून बेदखल करून शासनाच्या योजनांपासून वंचित ठेवल्यामुळे हताश झालेल्या युवकाने मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केल्याचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने प्रकाशित करताच पंचायत समितीचे अस्थापना विभागाचे विस्तार अधिकारी श्री चिंतावार यांनी भेट देवून तक्रारदार.......

कार्यशाळेचे आयोजन ..

नांदेड मध्ये डी.जी.फ्लिक ऑटो अल्बम सोफ्टवेअर डेमो व कार्यशाळेचे आयोजन ..

[Updated at : 24-10-2013 ]
नांदेड(प्रतिनिधी)नांदेड मध्ये प्रथमच डी.जी.फ्लिक या अत्याधुनिक सोफ्टवेअर कंपनीच्या वतीने अल्बम सोफ्टवेअर लाइव्ह डेमोचे आयोजन करण्यात आले असून, डी.३० रोजी जिल्ह्यातील संबंधित सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री कट्टी यांनी केले. 

बुधवार, 23 अक्तूबर 2013

भेट

पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांची नांदेड न्युज लाईव्हला भेट


हिमायतनगर(वार्ताहर)हिमायतनगर पोलिस स्थानकात कार्यरत असताना अवैध्य धंदेवाल्यांना सळो कि पळो करून सोडणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक तथा भाग्यनगर नांदेडच्या  पोलिस स्थानकाचे इन्चार्ज अनिलसिंह गौतम यांनी हिमायतनगर येथील उत्कर्ष फोटो गैलरीत

कनेक्शन तोडले

बिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले, महावितरणच्या सुलतानी कारभारामुळे शेतकरी हैराण...

हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन दिवाळीच्या तोंडावर कापसाला पाणी देणे गरज असताना महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज कनेक्शन तोडण्याचा सुलतानी कारभार सुरु केला आहे. कोणतीही पूर्व सूचना तथा मासिक बिलाचे वाटप करण्यापूर्वीच विद्दुत पुरवठा तोडल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.अश्या प्रकारे शेतकर्यांना वेठीस धरून महावितरण कंपनी काय सध्या करतेय असा सवाल शेतकरी व सामान्य वीज ग्रःकातून विचारला जात आहे. ...........

मंगलवार, 22 अक्तूबर 2013

गुंठेवारीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

गुंठेवारीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ,यापुढे मुदतवाढ नाही 
2001 पुर्वीच्या अनाधिकृत मालमत्ता नियमित करण्याची अंतिम सुवर्णसंधी

नांदेड(अनिल मादसवार)मालमत्ताधारकांची वाढती मागणी लक्षात घेऊन 2001 पुर्वीच्या अनाधिकृत मालमत्ता व बांधकामे नियमित करण्याच्या गुंठेवारी योजनेला पुन्हा मुदतवाढ मिळाली असून आता 31 डिसेंबर 2013 पर्यंत मालमत्ता धारकांना आपले प्रस्ताव दाखल करता येतील. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार अंतिम संधी देण्यासाठी ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यापुर्वी दाखल झालेले आणि फ़ेटाळण्यात आलेल्या प्रस्तावातील मालमत्ताधारकांविरुध्द कारवाई करण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या मालमत्ता नियमित करुन संभाव्य नुकसान टाळावे असे आ.......

गोवर्धनमठाचे शंकराचार्य स्वामी

गोवर्धनमठाचे शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती प्रथमच महाराष्ट्र आणि गोवा दौर्‍यावर
हिंदू जनजागृती समितीचा पुढाकार !

मुंबई(प्रतिनिधी)आद्यशंकराचार्यांनी स्थापलेल्या भारतातील चार पिठांपैकी गोवर्धनमठ, पुरी (ओडिशा) हे आद्यपीठ आहे. या पिठाचे विद्यमान शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती हे नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या दौर्‍यावर येत आहेत. या निमित्ताने त्यांच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या परखड विचारांचा आणि ज्ञानमय वाणीचा लाभ सर्वांना व्हावा, यासाठी हिंदू जनजागृती समितीने नवी मुंबई, गोवा आणि पुणे येथे त्यांच्या धर्मजागृती सभांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. या निमित्ताने आद्य शंकराचार्यांच्या पादूका दर्शन सोहळ्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. शंकराचार्यांच्या या दौर्‍यानिमित्त होणार्‍या 
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4398&cat=Latestnews

सोमवार, 21 अक्तूबर 2013

आदेश

गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर - फौजदारी गुन्ह्याचे आदेश


औरंगाबाद(प्रतिनिधी)खंबाळा(ता. किनवट ,जि. नांदेड) येथील दोनशे हेक्टर जमीन निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. भूसंपादन कारवाईत सहा कोटी ८९ लाख ३५ हजार ९०४ रुपयांचा अपहार झाला. या अपहार प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. यू. चांदीवाल व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ..........

आज भरणार शाळा

दिघीच्या विद्यार्थ्यांची शाळा आज भरणार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील दिघी येथील शाळेचा कारभार एकाच शिक्षकावर चालविला जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. अनेकदा मागणी करूनही शिक्षक दिला जात नसल्याने आज दि.२१ सोमवारी जी.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरविली जाणार आहे. ................

हदगाव येथे आ.सतीश चव्हाण भेट


भव्य मोर्चा

अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्याची मान्यता रद्द करावी,भव्य मोर्चाने नांदेड हादरले


नांदेड(सुरेश कुळकर्णी)मनपाच्या जुन्या नांदेड मधील इतवारा भागातील कत्तलखाना बंद करण्यात यावा तसेच अल माफ्को फ्रुजन फूड कंपनीला अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्यासाठी दिलेली मन्यता रद्द करावी या मागणीसाठी आज सोमवार दि.२१ रोजी पशुह्त्याविरोधी नागरी समितेने एक भव्य मोर्च्या काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले..........

अचानक तपासणी

भोकर येथील दहा कार्यालयातील ५ अधिकारी व ७५ कर्मचारी गैरहजर, उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या पंचनाम्यात उघड 

भोकर(मनोजसिंह चोहाण)शहरातील विविध शासकीय कार्यालयास उपविभागीय अधिकारी श्री केशव नेटके यांनी अचानक भेटी दिल्या असता ११ ते १.३० वाजेच्या दरम्यान दहा कार्यालयातील ५ अधिकारी व ७५ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. अचानक तपासणी केल्याने अधिकारी कर्मचार्यांमध्ये एकाच खळबळ उडाली असून, अनुपस्थित काम्चुकारांवर  काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4280&cat=Nanded

रविवार, 20 अक्तूबर 2013

विद्यार्थ्याचा तापिने मृत्यू

भोकर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा तापिने मृत्यू

भोकर(मनोजसिंह चोहाण)येथील कुसुमताई चव्हाण आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा तापिने मृत्यू झाल्याची घटना दि.२० रविवारी उपचारासाठी नांदेडला नेत असताना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. ........

निवड..

प्रेस फोरमच्या जिल्हाध्यक्षपदी कमलाकर बिराजदार यांची निवड.. कार्याध्यक्षपदी निलंगेकर तर सचिवपदी डॉ.हकीमखान


नांदेड(प्रतिनिधी)नांदेड जिल्हा प्रेस फोरमची कार्यकारी जाहीर झाली असून, जिल्हाध्यक्षपदी कमलाकर बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याक्रीनीच्या कार्याध्यक्षपदी विजय निलंगेकर तर सचिवपदी डॉ.हकीमखान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ......

सागवान तस्करी

आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरून सागवान तस्करी जोरात

हिमायतनगर(वार्ताहर)आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमा रेषेवरील वाशी, पवना, दरेसरसम, वाळकेवाडी, दुधड, वायवाडी, पोटा वनपरिक्षेत्रातील जंगलातून मौल्यवान सागवानाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. परिणामी जंगले भुईसपाट होत असून, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या वरिष्ठ अधिकारी कर्मचार्यांच्या आशीर्वादाने तस्करीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जंगलाचे रक्षकच भक्षक बनत असल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसून येत आहे. या प्रकाराकडे वनमंत्री, नांदेड जिल्हा वनाधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे. ............

धम्मचक्र प्रवर्तन दिन

सिरंजणी - एकंबा - कौठा ज.धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

सिरंजणी(वार्ताहर)एकंबा, कौठा ज., सिरंजणी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, यावेळी गावातून समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून अभिवादन केले. ..........

शनिवार, 19 अक्तूबर 2013

निवडणूक

निवडणूक प्रक्रीयेत सहभाग नोंदवा - जिल्हाधिकारी धीरजकुमार

नांदेड(प्रतिनिधी)प्रत्येक पात्र व्यक्तीने सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीयेत सहभागी झाले पाहिजे, मतदार यादीत नाव नोंदवून मतदान केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे.......

दोघांना अटक

मारहाण करून नदीपात्रात माणसाला फेकणाऱ्या दोघांना अटक

नांदेड(प्रतिनिधी)14 ऑक्टोंबर दुर्गाविसर्जनाच्या दिवशी सर्वत्र धामधुम सुरू असतांना दोघानी एका व्यक्तीला जबर मारहाण करून जीवंत नदीपात्रात फेकून दिले होते. काही वेळाने त्याचा मृत्यु झाला. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी दोघा मारेकऱ्याला अटक केली आहे.या संबंधाचे वृत्त दैनिक रिपब्लिकन गार्डने 16 ऑक्टोबर रोजी .........

संस्कृत विद्यापीठ

नांदेडला संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात यावे –लक्ष्मीकांत तांबोळी

नांदेड(अनिल मादसवार)नांदेड हे संस्कृत अध्ययनाचे प्राचीन केंद्र असून नांदेडला संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात यावे ,अशी मागणी प्रख्यात साहित्यिक व कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केली.नांदेडच्या होळी भागात असलेल्या संस्कृत पाठशाळेत शुक्रवारी (दि.१८) कोजागीरीचे औचित्य साधून काव्यतीर्थ........

दिंडीची सुरुवात

काकडा आरतीने सकाळच्या प्रहरी घुमू लागले हरी नामाचे स्वर...
परमेश्वर मंदिर संचालक मंडळीच्या उपस्थितीत दिंडीची सुरुवात

हिमायतनगर(अनिल मादसवार)अश्विन पोर्णिमा समाप्ती व कार्तिक स्नानानंतर शहरातील आराध्य दैवत श्री परमेश्वर मंदिर, महाकाली मंदिर व कालीन्का देवी मंदिराच्या महिला- पुरुष भजनी मंडळाच्या वतीने ता.१९ शनिवार पासून काकडा आरतीच्या दिंडीला प्रारंभ केला आहे. या दिंडीत व काकडा आरतीला वारकरी संप्रदायाच्या महिला पुरुष भक्तांनी उपस्थिती लावून गीत गायन केले जात असल्याने शहरवासियांना सकाळच्या प्रहरी गुमु लागलेल्या हरिनामाच्या मंजुळ स्वराची पाहत सुखदायक ठरत आहे. ........

गुरुवार, 17 अक्तूबर 2013

सांगता

शीख इतिहासात माता साहेबकौर देवांजी यांचे स्थान अबाधित - संतबाबा कुलवंतसिंघजी, भव्य मिरवणुकीने जन्मोत्सवाची सांगता


नांदेड(रवीन्द्रसिंग मोदी)खालसा पंथाच्या संचलनात माता साहेबकौर देवाजीं यांनी श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांना मोलाचे सहकार्य केले. तसेच गुरुजीं सोबत नांदेडच्या धरतीवर पोहचून माताजींनी येथे लंगर सारखी पंरपरा शुरु केली. माताजींचे स्थान शीख इतिहासात नेहमीच अबाधित राहील. असे प्रतिपादन गुरुद्वारा तख्त सचखंड साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी माता साहेब देवांजी जन्मोत्सव कार्यक्रमाने करण्यात आली.. 

समस्यांचा डोंगर

स्वार्थासाठी घड्याळ बांधनार्यांचे बारा वाजवा ... खा.वानखडे

हिमायतनगर(वार्ताहर)गावातील समस्यांचा डोंगर कायम ठेवून विकासाच्या वल्गना करत मीच कर्ताधर्ता आहे, विकास कामात माझ्याशिवाय पान हलत नाही.. असे म्हणनाऱ्याची कवडीची लायकी नसताना शिवसेनेने महत्वाच्या पदावर बसवून मोठे केले. परंतु स्वार्थासाठी घड्याळ बांधून चालत्या गाडीत बसू पाहणाऱ्या माकडछाप नेत्याला धडा शिकवून बारा वाजवा असे मत खा.सुभाष वानखेडे यांनी सवना ज.येथे बोलताना केले. .........

बुधवार, 16 अक्तूबर 2013

मोदीच्या नेतृत्वाला संधी द्या

जोड काँग्रेसचे सहस्त्रकुंन्डात विसर्जन करून मोदीच्या नेतृत्वाला संधी द्या .. नागेश पाटील हिमायतनगर(प्रतिनिधी)मागील चार वर्षाच्या काळात सत्ताधारी पुढार्यांनी विकास कामाच्या नावाखले जनतेची दिशाभूल करून स्वतःचा विकास साध्य केला आहे. हि बाब उघड असून, येथील जनता सुशिक्षित व परिवर्तन वाडी विचाराची आहे. त्यामुळे कुठे काय घडते हे सर्वाना ठावूक आहे, तेंव्हा  आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत जोड काँग्रेसचे सहस्त्रकुंड धरणात विसर्जन करून मोदीच्या नेतृत्वाला संधी दया असे मत हदगाव विधानसभेचे युवा नेते नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले.....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4197&cat=Himayatnagar

ग्रामसेवकावर गुन्हा

राष्ट्रीय आर्थिक गणना कामास टाळाटाळ; ६ ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

हदगाव(वार्ताहर)देशाची सहावी आर्थिक गणना १५ ऑक्टोबर पासून सुरू झाली असून हदगाव येथील तहसीलदारांचे आदेश न पाळणार्‍या सहा ग्रामसेवकांवर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ............

विसर्जन

दांडियाच्या तालावर शारदा देवीचे विसर्जन


हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील रुख्मिणी नगरात महिला मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शारदा मातेचे विसर्जन सातव्या दिवशी ता.१६ बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात दांडियाच्या तालावर करण्यात आले. .......

मंगलवार, 15 अक्तूबर 2013

शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळावा

तर ...अशोकरावांचे पुनर्वसन होईल जेलमध्येच ...खा.वानखेडे

हिमायतनगर(अनिल मादसवार)सत्ताधारी पक्षाच्या काही जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशोकरावांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याचा गवगवा केला जात आहे. परंतु आदर्श प्रकरणामुळे ते गोत्यात आले असून, त्यांच्या अडचणी वाढतच आहेत. त्यांचे पुनर्वसन होईल.. परंतु ते सुद्धा जेलमध्ये असे खळबळजनक वक्तव्य हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार सुभाष वानखेडे यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील सवना ज. येथील शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर हदगाव विधानसभेचे युवा नेते नागेश पाटील आष्टीकर, माजी. जी.प.स.बाबुराव कदम कोहळीकर, हिमायतनगर तालुका प्रमुख डॉक्टर प्रकाश वानखेडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. ..

मातेला निरोप

भंडारा उधळीत दुर्गा मातेला निरोप


हिमायतनगर(वार्ताहर)शहरासह तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा मातेच्या मुर्त्यांचे भंडारा व गुलालाची उधळण करीत विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो महिला उदो उदो..च्या जयघोष, दांडियाच्या रास रचत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. ..

कृषी प्रतिष्ठाने बंद

क्वालिटी विभागाचे पथक दाखल होताच कृषी दुकानांची शटर बंद

हिमायतनगर(वार्ताहर)शहरात दि.१५ रोजी दुपारी जिल्हा पातळीवरील क्वालिटी विभागाचे पथक दाखल झाले असून, याची माहिती संबंधिताना मिळताच शहरातील बहुतांश कृषी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद केल्याचे दिसून आले आहे. ...........

सोमवार, 14 अक्तूबर 2013

पथसंचालन

विजयादशमी निमित्त संघाचे वाद्याच्या गजरात पथसंचालन...


हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील परमेश्वर मंदिरापासून अश्विन शुद्ध १० विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोमवार दि.१४ रोजी पथसंचालन व शस्त्र पूजेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाढोणा तालुका संघचालक डॉ.दिगंबर डोंगरगावकर, महाविरचंद श्रीश्रीमाळ, शाम रायेवार, सुधीर उत्तरवार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. .......

जन्मोत्सव

मातासाहेब गुरुद्वारात जन्मोत्सव कार्यक्रमआज पासून


नांदेड(विशेष प्रतिनिधी)ऐतहासिक गुरुद्वारा मातासाहेब येथे मंगळवार, दि. १५ अक्टोबर रोजी माताासाहेब देवांजी यांच्या ३३२ व्या जन्मोत्सवाचे तीन दिवसीय कार्यक्रमसुरु होत आहे. या कार्यक्रमासाठी मातासाहेब येथे भव्य मंडप उभारण्यात आले असून भाविकांसाठी राहण्याची व लंगरची सोय करण्यात आली असल्याची माहिती मातासाहेब गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा प्रेमसिंघजी आणि गुरुद्वारा लंगरसाहेबचे संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी दिली. या वेळी नांदेड दक्षिणचे आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची ही उपस्थिती होती. ..

गैरहजर..

शिक्षक नियुक्त करूनही गैरहजर....पाचव्या दिघीची शाळा रिकामी... २० पर्यंत शिक्षक रुजू न झाल्यास जिल्हा परिषदेत भरविली जाणार शाळा.हिमायतनगर(अनिल मादसवार)दिघी येथील शाळेचा कारभार केवळ एकाच शिक्षकावर चालविला जात असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. या प्रकाराला कंटाळून येथील शिक्षण प्रेमी पालकांनी शाळेत विद्यार्थी न पाठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिक्षण विभागाने दोघांची  नियुक्ती पत्र दिले असले तरी अद्याप शाळेवर शिक्षक हजार झाले नाही. परिणामी पाचव्या दिवशीसुद्धा  शाळा रिकामीच आहे. या प्रकारामुळे पालक वर्गात संतापाची भावना व्यक्त होत असून, २० तारखेपर्यंत शिक्षक रुजू न झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरविण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. .........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4142&cat=Himayatnagar

रविवार, 13 अक्तूबर 2013

हल्लाबोल

हल्लाबोल उत्सव जल्लोषात साजरा........
शिख तरुणांनी दाखविलेली प्रात्याक्षिके भाविकांचे लक्ष वेधणारे ठरले

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड हुजूर साहिब सचखंड गुरुद्वा-यातून सायंकाळी ४ वाजता हल्लाबोल मिरवणुकीला प्रारंभ झाला. महाविर चौकामध्ये मिरवणूक येताच बोले सो निहाल सतश्रीअकालच्या जयघोषात शिख समाज बांधवांनी पारंपारिक रित्या प्रतिकात्मक हल्लाबोल करून उत्सव जल्लोषात साजरा केला. शिख तरुणांनी दाखविलेली प्रात्याक्षिके भाविकांचे लक्ष वेधणारे ठरले या वेळी लाखो शिख समाज भाविकांचा सहभाग दिसून आला. ..........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

विजयदशमी

रावण दहनाने विजयदशमी साजरी


हिमायतनगर(वार्ताहर)येथील परमेश्वर मंदिर मैदानात रविवारी रात्री ८.३५ मिनिटांनी जय श्री रामच्या जयघोषाने रावण दहनाचा कार्यक्रमाने विजयादशमी साजरी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांना आपल्यातील अहंकार रुपी रावणाचे आजपासून दहन करून चांगले विचार अंगीकारा असे आव्हानही करण्यात आले आहे. ....................
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4124&cat=Himayatnagar

शोभायात्रा

दशहरा व धम्मचक्र प्रवर्तन दीनहिमायतनगर(वार्ताहर)शहरातील बांधवांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेबांच्या तैलचित्राची शोभायात्रा काढून उत्सव साजरा करण्यात आला.
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4122&cat=Latestnews

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com