हिमायतनगरात चोरीचे सत्र सुरूच; शुक्रवारच्या मध्यरात्री पुन्हा एका चोरीत लाखोंचा माल लंपास -NNL

चोरटयांना पकडण्यात पोलीस अपयशी 


हिमायतनगर,अनिल नाईक | शहरात व ग्रामीण भागात चोरीच्या घटना सुरूच असून,नातेवाईकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी  बाहेर गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरटयांनी शुक्रवारच्या मध्यरात्री हिमायतनगर शहरातील गुजरी चौकात असलेल्या सिपाई मोहल्ला मधे असलेल्या शिंदे यांच्या घरचे कुलूप तोडून लाखोंचे सोने-चांदीचे दागिन्याह नगदी रक्कम घेऊन चोरटयांनी पोबारा केला आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, नागरिकात चोरट्यांनी भीती निर्माण झाली आहे. यानंतर तरी पोलिसांनी रात्र गस्तीत वाढ करून नागरिकांना चोरट्यापासून सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे, या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षक आणि ३० ते ३५ पोलीस कर्मचाऱ्याच्या स्टाफ आहे. असे असताना देखील  हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटना गेल्या काही महिन्यापासून काही दिवसाच्या अंतरावर सुरूच आहेत. मागल्या तीन महिन्याच्या काळात झालेल्या एका व्यापाऱ्याच्या चोरीच्या घटनेवरून हिमायतनगर पोलीस प्रशासन चांगलेच चर्चेत आले होते. त्या युवा व्यापाऱ्यांनी चोरीच्या तपास लागावा म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आदींसह अनेक नेत्यांपर्यंत जाऊन चॊरीच्या तपासाला गती मिळावी म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे या चोरीचा अखेर पोलिसांनी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांती तपास लावला आहे. त्या घटनेतील अनेक आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेऊन जवळपास २.५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्या चोरट्याना अटक केल्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा हिमायतनगर शहरात आणि ग्रामीण भागात चोरीची घटना घडली. तेंव्हापासून सुरु झालेल्या चोरीच्या घटनांचा सिलसिला चालूच असून, चोरट्याने मागील महिन्यात शहरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिराची दानपेटी फोडून चोरटयांनी गणेशोत्सव काळात भक्ताच्या देणगीतून जमा झालेली रक्कम पळविली होती. त्यानंतर याच रात्रीला घारापुर येथेही चोरटयांनी बंद घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने पळविले होते. त्यानंतर महालक्ष्मी उत्सवाच्या दरम्यान बाहेर गावाला गेलेल्या हिमायतनगर शहरातील ढोणे गल्ली आणि गणेश चौकातील अश्या दोंनघरात अज्ञात चोरट्यानी चोरी करून एलईडी टीव्ही आणि नगदी रक्कम लंपास केली. यासर्व घटनांचा घटनाक्रम पाहता शहरातील नागरिकांनी पोलिसांनी रात्रगस्त वाढवून शहरात पुन्हा चोरीच्या घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली होती.  

मात्र ये रे माझ्या मागल्याप्रमाणे शहरातील पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपेतच आहेत कि काय..? असे आता शहरातील जनतेला वाटायला लागले आहे. कारण शुक्रवारी पुन्हा हिमायतनगर शहरातील गुजरी चौक, सिपाई मोहल्ला मधे असलेल्या संजय कोंडिबाराव शिंदे यांच्या घराचे कुलूप कोंडा तोडून अज्ञात चोरट्यानी दि.०८ रोजीच्या मध्यरात्रीला घरात प्रवेश केला. आणि घरातील अलमारीची तोडफोड करून त्यातील सोने - चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम लंपास केली आहे. हा प्रकार दि. ०९ रोजी शेजारच्यांनी दूरध्वनीवरून माहिती देताच शिंदे परिवार गावी आले. याची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सोने-चांदीचे दागिने ज्यात झुमके, गळ्यातील हार, कानातले, सोन्याचे काही तुकडे, चांदीचे दण्डकडे, जोडवे, यासह नगदी रक्कम घेऊन चोरटयांनी चोरून नेल्याचे दिसले आहे. 

या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून, रात्रीला श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परंतु रात्रीला पाऊस झाल्यामुळे चोरट्यांचा माग श्वानास काढता आला नाही. तरी ठसे तज्ज्ञाने अज्ञात चोरट्यांचे ठसे सैंपल घेतले आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि चोरीची घटना उघडी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रार कर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. या चोरीच्या घटनेमुळे हिमायतनगर शहर व परिसरात पुन्हा एकदा नागरिकात चोरट्यांनी दहशत निर्माण केली असून, या घटनांना आवर घालण्यासाठी रात्र गस्तीत वाढ करून नागरिकांना चोरट्यापासून सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.          

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी