आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरून सागवान तस्करी जोरात
हिमायतनगर(वार्ताहर)आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमा रेषेवरील वाशी, पवना, दरेसरसम, वाळकेवाडी, दुधड, वायवाडी, पोटा वनपरिक्षेत्रातील जंगलातून मौल्यवान सागवानाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. परिणामी जंगले भुईसपाट होत असून, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या वरिष्ठ अधिकारी कर्मचार्यांच्या आशीर्वादाने तस्करीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जंगलाचे रक्षकच भक्षक बनत असल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसून येत आहे. या प्रकाराकडे वनमंत्री, नांदेड जिल्हा वनाधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे. ............