डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून मदरशांना अनुदान
नांदेड(अनिल मादसवार)ज्या मदरशांमध्ये फक्त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्यात येत आहे आणि ज्यांना आधुनिक शिक्षणाकरिता शासकीय अनुदान घेण्याची इच्छा आहे अशा मदरशांकडून अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन अर्ज मागवित आहे. सदर मदरसे धर्मेदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. अशा मदरशानी शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2013 च्या तरतुदीनुसार पुढील बाबींकरिता विहित नमुन्यात अर्ज करावेत. विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्या -करिता शिक्षकांना मानधन देणे, पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान आणि मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. ...........